शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

 तूर डाळीचे दर १३५ रुपयांच्या विक्रमी पातळीवर!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 17, 2023 19:02 IST

Nagpur News सध्या डाळीचे दर १२५ ते १३५ रुपयांदरम्यान असले तरीही येत्या काही दिवसात दरवाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा तूर डाळीचा उच्चांक ठरणार आहे.

मोरेश्वर मानापुरे नागपूर : सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्य पदार्थ म्हणून डाळीकडे पाहिले जाते. आता डाळ महाग झाल्याने खावे तरी काय असा प्रश्न पडू लागला आहे. सध्या डाळीचे दर १२५ ते १३५ रुपयांदरम्यान असले तरीही येत्या काही दिवसात दरवाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा तूर डाळीचा उच्चांक ठरणार आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

आता तूर डाळ उच्चवर्गीयांचीसिझनच्या प्रारंभी तूर डाळीचे दर दर्जानुसार ९५ ते १०५ रुपये होते. हे दर अनेक दिवस स्थिर होते. त्यानंतर स्थानिक शेतकरी, राज्याबाहेरील व्यापारी आणि विदेशातून तूरीची आवक कमी झाल्यानंतर भाव वाढू लागले. त्याप्रमाणात डाळीची किमतीतही वाढली. आता तूर डाळ उच्चवर्गीयांची झाली आहे.

तूर ८८ ते ९५ रुपये किलोतूर उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये महत्त्वाची आहेत. यंदा तूरीचे उत्पादन कमी झाले आहे. दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तूरीचे आयात शुल्क १० टक्क्यांवरून शून्य टक्क्यांपर्यंत कमी केले. त्यानंतरही दर वाढतच आहे. यंदा विदेशात तूरीचे उत्पादन कमी असल्यामुळे आयातीत भाव वाढले आहेत. धान्य आडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, कळमन्यात तूरीचे दर ८८ ते ९५ रुपये किलो असून आवक दररोज १५०० ते २ हजार क्विंटल आहेत. या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. पण यंदा पुरेशी तूर मिळत नाही. त्यामुळेच तूर डाळीचे दरही वाढत आहेत. डाळीचे दर वाढत असल्यामुळे तुरीलाही आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

आयात कमीचधान्य बाजाराचे विश्लेषक प्रताप मोटवानी म्हणाले, यंदा देशात तूरीचे उत्पादन आणि तूरीची आयात कमीच आहे. दरवर्षी बर्मा, सुदान आणि दक्षिण अफ्रिकन देशातून तूरीची आयात होते. सरकारने आयात शुल्क शून्य टक्क्यांवर आणून आयातीचे दरवाजे खुले केले आणि आयातीची मर्यादाही हटविली. त्यानंतरही आयात कमीच आहे. सरकारच्या या निर्णयामुळे डाळीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. देशात डिमांड जास्त तर पुरवठा कमी आहे. दुसरीकडे भारतातून तूर डाळीची निर्यात होते. नवीन तूरीचे उत्पादन जानेवारीमध्ये येते. उत्पादन येईपर्यंत तूरीचे दर कमी होणार नाहीत.

पॅकेजिंगवर ५ टक्के जीएसटीतूर डाळीच्या १ ते २५ किलोच्या पॅकिंगवर सरकारतर्फे ५ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. जीएसटी लागू नये म्हणून व्यापाऱ्यांनी तूर डाळीच्या पोत्याची भरती २६ किलो केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार लहान व्यापाऱ्यांना साठ्याचा डेटा द्यावा लागतो. मोठ्या कंपन्यांना कायदा लागू आहे वा नाही, हेच कळत नाही. बाबा रामदेवबाबा यांना जीएसटीमध्ये सूट आहे. अशीच सूट लहान व्यापाऱ्यांनाही मिळावी, अशी मागणी प्रताप मोटवानी यांची आहे.

तूर डाळीचे दर (प्रति किलो) :वऱ्हाडी फटका १३२-१३५मध्यम फटका १२५-१३०फोड १२०-१२५

टॅग्स :foodअन्न