अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आज स्वाक्षरी मोहीम

By Admin | Updated: April 12, 2017 02:06 IST2017-04-12T02:06:15+5:302017-04-12T02:06:15+5:30

पाकिस्तानच्या कैदेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने तात्काळ प्रयत्न करावेत....

Today's signature campaign led by Ashok Chavan | अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आज स्वाक्षरी मोहीम

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आज स्वाक्षरी मोहीम

नागपूर : पाकिस्तानच्या कैदेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने तात्काळ प्रयत्न करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभर सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे.
प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आज, बुधवारी दुपारी २.३० वाजता व्हेरायटी चौकात या स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ होईल.
या आंदोलनात नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's signature campaign led by Ashok Chavan