हायकोर्टाचे नवीन नवीन रोस्टर आजपासून

By Admin | Updated: June 9, 2014 01:14 IST2014-06-09T01:14:03+5:302014-06-09T01:14:03+5:30

मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून उद्या, सोमवारपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे.

From today's new new roster to the High Court | हायकोर्टाचे नवीन नवीन रोस्टर आजपासून

हायकोर्टाचे नवीन नवीन रोस्टर आजपासून

नागपूर : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून उद्या, सोमवारपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे.
नागपूर खंडपीठाचे रोस्टर बदलले आहे. त्यानुसार, उद्यापासून न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्याकडे सर्व जनहित याचिका, लेटर्स पेटेंट  अपील्स, फस्र्ट अपील्स, टॅक्स अपील्स व अन्य न्यायपीठाला दिल्या नाहीत अशा दिवाणी रिट याचिकांची जबाबदारी राहणार  आहे. न्यायमूर्तीद्वय  भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग हे सर्व प्रकारच्या फौजदारी प्रकरणांचे कामकाज सांभाळणार आहेत तसेच, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व  विश्‍वास जाधव यांच्या तिसर्‍या युगल न्यायपीठाकडे १९९७ पर्यंतच्या, १९९९, २00१ ते २00५ आणि २0११ ते २0१३ पर्यंतच्या दिवाणी रिट  याचिकांचे कामकाज सोपविण्यात आले आहे. गेल्या ३ मार्च रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेले विश्‍वास जाधव नागपूर खंडपीठात प्रथमच  कामकाज पाहणार आहेत.
न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्याकडे सेकंड अपील्स व अन्य न्यायपीठाला दिली नाहीत अशी दिवाणी प्रकरणे, न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे  २000, २00२, २00४, २00६, २00८, २0१0, २0१२ व २0१४ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे अपील्स  अगेन्स्ट ऑर्डर्स, दिवाणी पुनर्विचार अर्ज, किरकोळ दिवाणी अर्ज, फस्र्ट अपील्स, न्यायमूर्ती मदनलाल तहलियानी यांच्याकडे नियमित जामीन अर्ज,  अटकपूर्व जामीन अर्ज व जामिनासंदर्भातील इतर अर्ज, वर्ष २000 पर्यंतच्या व २0११ नंतरच्या सर्व फौजदारी अपील्स, न्यायमूर्ती प्रदीप देशमुख  यांच्याकडे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी ४८२ अंतर्गतचे फौजदारी अर्ज, २00१ ते २0१0 पर्यंतच्या फौजदारी अपील्स व अन्य न्यायपीठाला  दिली नाहीत अशी  फौजदारी प्रकरणे, तर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे १९९७ ते १९९९, २00१, २00३, २00५, २00७, २00९ व २0११ ते  २0१३ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका आणि दिवाणी अवमानना याचिकांची जबाबदारी राहणार आहे.(प्रतिनिधी)
 

Web Title: From today's new new roster to the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.