लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ते पाक्षिक म्हणजे त्यावेळी समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. आजची परिस्थितीही भीषण असून त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी कवी इ.मो. नारनवरे यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला. या घटनेला पुढच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीर मुक्तिवाहिनी व रिपब्लिकन मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मूकनायक शताब्दी वर्ष समारोह आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.या समारोहाची सुरुवात गुरुवारी संविधान चौक येथून करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. मूकनायक या पाक्षिकाच्या पहिल्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचे सामूहिक वाचन करून त्यावर चिंतन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अग्रलेखात सांगितलेल्या गोष्टी आणि दिलेला इशारा आजही तंतोतंत लागू होतो. तेव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करावी, असे आवाहन नारनवरे यांनी केले. यावेळी सुधीर भगत, भोजराज हाडके यांनीही मूकनायक पाक्षिकाच्या प्रासंगिकतेवर प्रकाश टाकला.संचालन का.रा. वालदेकर यांनी केले. नरेश वाहाणे यांनी आभार मानले.यावेळी विलास भोंगाडे, बबन चहांदे, आ. हेमंत नागदिवे, एन.एल. नाईक, प्रवीण कांबळे, सेवक लव्हात्रे, सुधीर ढोके, गोविंद वाघमारे, राजकुमार वंजारी, अनिल वासनिक, संजय गोडघाटे, नामदेवराव खोब्रागडे, शिवचरण थूल आदी उपस्थित होते.समाजाच्या पुनर्रचनेचा तो प्रारंभिक हस्तक्षेपयावेळी आर्किटेक्ट नरेंद्र शेलार म्हणाले, बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूकनायक या पाक्षिकाच्या शंभराव्या वर्षसमारोहानिमित्त वर्षभर अभियान चालवण्याचे ठरवले आहे. मूकनायक सुरू करून बाबासाहेबांनी समाजरचनेच्या बदलाचे आव्हान केले होते. त्या माध्यमातून त्यांनी समाज पुनर्रचनेची विचारधारा या देशात रुजवण्याचे कार्य केले. सामाजिक पुनर्रचनेचाचा बाबासाहेबांनी केलेला तो प्रारंभिक हस्तक्षेप होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज : इ.मो. नारनवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:42 IST
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ते पाक्षिक म्हणजे त्यावेळी समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. आजची परिस्थितीही भीषण असून त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी कवी इ.मो. नारनवरे यांनी येथे केले.
समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज : इ.मो. नारनवरे
ठळक मुद्दे मूकनायक शताब्दी वर्षसमारोहाला सुरुवात