शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

आज 'हग डे' : त्राण दूर करणारी 'जादू की झप्पी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:07 IST

भावनेला मोकळीक करवून देणारा आणि अबोल कृतीतून सारे काही सांगणारा आज ‘हग डे’ अर्थात ‘आलिंगन दिवस’ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाषेचा तो फरक आहे आणि त्यामुळे त्यात गमतीही आहेत. आता हेच बघा ना, इंग्रजीतील ‘किस’ हा शब्द जेवढा सहज वाटतो, तेवढाच मराठी किंवा हिंदीमधील त्याच अर्थाने ‘चुंबन’ म्हटले की अवघडल्यासारखे होते. इंग्रजीमध्येच ‘सेक्स’ हा शब्द अश्लील, उग्र भावना निर्माण करतात आणि त्याच अर्थाने मराठी किंवा हिंदीमध्ये ‘प्रणय’ हा शब्द सोज्वळ, भावनाप्रधान वाटतो. अर्थ तेच, मात्र एका भाषेतील भावनेला असणाऱ्या शब्दाला दुसऱ्या भाषेत मिळणारा अर्थ भिन्न असल्याने, या गमती असतात. अशीच गंमत ‘व्हॅलेंटाईन विक’मधील ‘हग डे’ या शब्दाची आहे. मराठी किंवा हिंदीमध्ये या शब्दाचा तंतोतंत अर्थ विश्लेषण करून सांगायला नको! पण, इंग्रजीतील याच शब्दाचा मराठी किंवा हिंदी अर्थ दिलासा देणारा आहे, भावनेला मोकळीक करवून देणारा आणि अबोल कृतीतून सारे काही सांगणारा आहे. आज ‘हग डे’ अर्थात ‘आलिंगन दिवस’मानवाच्या प्रत्येक कृतीला गहिवर असतो, गांभीर्य असते. भावना जेव्हा उत्कट होतात, तेव्हा सहजगत्या घडणाºया कृतीला संवेदनेची झालर असते. नवजातक आपल्या मातेच्या छातीला सतत चिकटून असतो. जरा दूर केले की तो नवजात ‘क्वॅ क्वॅ’ रडतो, जणू दोघांचीही हृदयगती एकमेकांशी सतत संवाद घालत असतात. दूर होताच, त्या संवादात खंड पडतो आणि शब्दांचा अभाव असलेल्या त्या नवजातकाच्या उरातून निघणारी ती ओरड आर्जवी असते. त्या नि:शब्द आर्जवाचा अर्थ ‘ये आई मला तू अशीच कवटाळून धर ना’ हा आपण सहजगत्या समजून घेतो. याचा अर्थ भावना जेव्हा निरागस होतात, तेव्हा त्या कवटाळण्याचे, आलिंगनाचे महत्त्व स्पष्ट होते. आलिंगनाची कृतीच निराळी आहे. ‘व्हॅलेंटाईन विक’मध्ये रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे साजरे झाले. हे सगळे विशिष्ट भावना साजरे करणारे दिवस असले तरी ‘प्रेम’ या प्रक्रियेला पूर्णत्व प्रदान करण्याच्या या पायºया आहेत. प्रेमात निर्माण होणाºया प्रत्येक भावनांशी हे दिवस निगडित आहेत. त्याच प्रक्रियेत येणारा ‘आलिंगन’ या कृतीचे महत्त्व ‘हग डे’मधून प्रतिपादित होते.मेंदू जड व्हायला लागतो, हृदयाचा थरकाप उडतो आणि मन अस्थिर व्हायला लागते, तेव्हा आपण निर्विकार झालेलो असतो. स्वत:ला शून्यत्वाची प्रचिती होण्याचा क्षणच! जणू आपण नवजातक झालेले असतो आणि एखाद्या खंबीर हृदयाचा आधार शोधत असतो. ही अत्यंत पवित्र भावना असते आणि म्हणून सहजच आपल्या अगदी विश्वासाच्या व्यक्तीला आलिंगन देऊन काही क्षण निवांत राहावे, असे वाटत असते. शून्यत्वातून पुन्हा एकदा नवे अंकगणित सुरू व्हायला लागते. म्हणूनच ‘आलिंगन’ महत्त्वाचे ठरते. यालाच मुन्नाभाईच्या भाषेत ‘जादू की झप्पी’ म्हणूयात. मग काय देणार ना ‘जादू की झप्पी’.

 

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकnagpurनागपूर