बुटीबोरीत आज आरोग्य तपासणी शिबिर
By Admin | Updated: October 8, 2014 01:03 IST2014-10-08T01:03:31+5:302014-10-08T01:03:31+5:30
समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ८ आॅक्टोबर रोजी भव्य नि:शुल्क

बुटीबोरीत आज आरोग्य तपासणी शिबिर
जैन सहेली मंडळाचा उपक्रम : महिला व बालकांसाठी नि:शुल्क
नागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ८ आॅक्टोबर रोजी भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अॅन्ड वेल्फेअर सेंटर, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १०.३० वाजतापासून शिबिराला सुरुवात होईल. महिला व बालकांसाठी हे शिबिर नि:शुल्क आहे.
या आरोग्य शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि महात्मे नेत्रपेढी इस्पितळ यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. डॉ. संजय दर्डा व डॉ.अनिता दर्डा यांच्या नेतृत्वात उपराजधानीतील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ या शिबिरात सहभागी होणार आहेत. शिबिरात गरजवंत रुग्णांचे डोळे तपासून त्याचवेळी मोफत चष्मेवाटप करण्यात येईल. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार महात्मे नेत्रपेढी इस्पितळ येथे मोतीबिंदूची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल.
याकरिता येणाऱ्या रुग्णांना स्वत:चे ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. नोंदणी शिबिराच्या ठिकाणीच दुपारी १ वाजेपर्यंत होईल. बुटीबोरी येथील महिलांनी या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जैन सहेली मंडळाच्या अध्यक्ष माधुरी बोरा यांनी केले असून अधिक माहितीसाठी रजनी शहलोत (९३७३१००६९०), रीतिका संघवी (९४२०३९७५६८) व अमिषा नगरवाला (९८२२२६५५६५) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
मेडिकलचे डॉक्टर
देणार सेवा
या शिबिरात मेडिकलचे औषधवैद्यकशास्त्र तज्ज्ञ (फिजिशियन), शल्यचिकित्सक (सर्जन), अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ (गायनकॉलाजिस्ट), बालरोग तज्ज्ञ (पेडियाट्रीशियन) आपली सेवा देणार आहेत. यातील गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मेडिकलमध्ये बोलविण्यात येईल.
गरजवंताना मोफत चष्मे
महात्मे नेत्रपेढी इस्पितळातर्फे शिबिरात गरजवंत रुग्णांचे डोळे तपासून त्याचवेळी मोफत चष्मेवाटप करण्यात येईल. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोतीबिंदूची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल.
हिमोग्लोबीन, ईसीजीची तपासणी
शिबिरात सहभागी होणऱ्या महिलांचे हिमोग्लोबिन, ईसीजी व रक्तदाबाची नि:शुल्क तपासणी करण्यात येईल.