शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आज जागतिक उच्च रक्तदाब दिन; योग्य जीवनशैली आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 10:26 IST

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन; हे तीन व्यक्तींमधून एकामध्ये याची लक्षणे आढळून येतात. चोर पावलांनी येणारा हा आजार जगाच्या आरोग्यासमोरचे आव्हान ठरत आहे.

ठळक मुद्दे९.४ दशलक्ष मृत्यू ‘हाय ब्लड प्रेशर’ने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन; हे तीन व्यक्तींमधून एकामध्ये याची लक्षणे आढळून येतात. चोर पावलांनी येणारा हा आजार जगाच्या आरोग्यासमोरचे आव्हान ठरत आहे. दरवर्षी वेळेच्याआधी मृत्यूमुखी पडणाऱ्या ९.४ दशलक्ष लोकांच्या मृत्यूला हाच आजार कारणीभूत ठरत आहे. या व्याधीला दूर ठेवायचे असेल तर योग्य जीवनशैली आत्मसात करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.उच्च रक्तदाब हा आजार नाही. पण होणाऱ्या आजाराची चाहूल मात्र नक्की म्हणता येईल. उच्च रक्तदाब ही तक्रार आजच्या धावपळीच्या जीवनशैलीची सामान्य बाब होऊ पाहते आहे.सर्वसाधारणपणे १२० ते १३० ही रक्तदाबाची वरची पातळी सामान्य मानली जाते, तर ८० ते ९० ही खालची पातळी नॉर्मल रक्तदाबामध्ये गणली जाते. रक्तदाब हा व्यक्तीच्या वयानुसार, कामाच्या स्वरूपानुसार आणि काही प्रमाणात अनुवांशिकतेवर अवलंबून असतो. रक्तदाबाची वरची पातळी ही व्यक्तीचं वय अधिक १०० मिळून येणारा आकडा नॉर्मल धरला जातो. उदा. ४५ वय असणाऱ्या व्यक्तीसाठी १४० ते १५० ही वरची पातळी नॉर्मल मानली जाते. अशा वयाच्या व्यक्तीमध्ये १६० या पातळीच्यावर रक्तदाब गेल्यास तसेच खालची पातळी ९५ पेक्षा अधिक दिसून आल्यास त्या व्यक्तीस उच्चरक्तदाब असण्याची शक्यता असते.

रक्तदाब का वाढतो?उच्च रक्तदाब दोन प्रकारचा असू शकतो. पहिला म्हणजे रक्तदाब वाढण्यामागे एखाददुसरा आजार दडलेला असतो. अशावेळी उच्च रक्तदाब हे लक्षण दीर्घकाळ टिकून राहणारं असतं.परंतु काही परिस्थितीमध्ये काही विशिष्ट काळापुरताच रक्तदाब वाढलेला आढळतो. उदा. अचानक बसलेला मानसिक धक्का, भीती, गर्भारपण हे रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतं.कित्येक वेळा आपला रक्तदाब आता मोजला जाणार या भीतीनेदेखील काही व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढलेला आढळून येतो. डॉक्टरांच्या केबिनमध्ये पाऊल ठेवताच तात्पुरता वाढलेला रक्तदाब आणि मोजण्याच्या नुसत्या कल्पनेनं वाढलेला रक्तदाब फसवा असू शकतो. या फसव्या उच्च रक्तदाबाला व्हाईटकोट हायपरटेन्शन असं म्हणतात.याशिवाय शरीरांतर्गत असलेल्या काही आजारांमध्ये रक्तदाब वाढलेला दिसतो. मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा येणं, मूत्रपिंडाला आतून सूज येणं, मूत्रपिंडाना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात काही दोष निर्माण होण्यासारख्या प्रकारात मूत्रपिंडावरील ताण वाढून रक्तदाब वाढतो.शरीरभर रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. उदा. रक्तवाहिन्यांना काठिण्य येणं. परिणामी शरीराच्या रक्ताभिसरणामध्ये अडथळा येऊन त्याचा ताण हृदयावर पडत रक्तदाब वाढतो.याशिवाय शरीरातील कार्य सुरळीत चालू रहावे यासाठी आवश्यक असणाऱ्या संप्रेरकांमध्ये बिघाड झाल्यास रक्तदाब वाढलेला दिसतो.कोणत्याही कारणाने मेंदूभोवती असणारा दाब वाढल्यास त्याचा परिणाम रक्तदाबावर होतो.धावपळीची जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, बंद पाकिटातील अन्न सेवन, सिगरेट, तंबाखू, दारूचे व्यसन, अपुरी झोप, अपुरी विश्रांती ही कारणेदेखील रक्तदाब वाढण्यात कारणीभूत ठरतात.

रक्तदाब वाढला तर...तात्पुरता रक्तदाब वाढल्यास त्याचा शरीरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. परंतु सतत उच्च रक्तदाबामुळे महत्त्वाच्या अवयवांना इजा होऊ शकते. हृदयाचा आकार वाढणे, हृदयाच्या भागात वेदना होणे, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या कामात बिघाड होणे आणि परिणामी हृदय कमकुवत होणे, यासारखे परिणाम उच्च रक्तदाबामुळे थेट दिसून येतात.उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या कार्यात बाधा निर्माण होणे, अतिउच्च रक्तदाबामुळे मेंदू भोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता निर्माण होते.उच्चरक्तदाबाचा ताण डोळ्यातील रक्तवाहिन्यांवरदेखील दिसून येतो. रक्तदाब नियंत्रणाअभावी डोळ्यात रक्तस्राव होऊन दृष्टी अधू होण्याची शक्यता दिसून येते.

टॅग्स :Healthआरोग्य