शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

By योगेश पांडे | Updated: September 27, 2025 15:04 IST

तारखेनुसार आज संघाची शताब्दी : संघस्थापनेच्या चार वर्षांनी डॉ. हेडगेवार झाले सरसंघचालक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २७ सप्टेंबर १९२५चा विजयादशमीचा दिवस अन् महालातील शुक्रवारी परिसरातील वाड्यात जमलेले काही मोजके तरुण... तेथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी शब्द उच्चारले, 'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत' आणि देशातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. ना कुठली सार्वजनिक घोषणा, ना गाजावाजा, ना कुठले अतिथी. नागपुरात मुख्यालय असलेल्या व देशविदेशात विस्तार झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला तारखेनुसार शनिवारी सुरुवात होणार आहे.

मागील शंभर वर्षात संघाने अनेक चढउतार पाहिले व संघाचे स्वयंसेवक आज देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र संघाची सुरुवात अतिशय शांतपणे झाली होती. संघ स्थापनेच्य वेळी डॉ. हेडगेवार यांनी कुठलीही कार्ययोजनादेखील मांडली नव्हती.

२५ स्वयंसेवकांनी ठरविले संघाचे नाव

संघाची स्थापना झाली तेव्हा त्याचे नेमके असे नाव नव्हते. १७ एप्रिल १९२६ रोजी डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात २५ सदस्यांनी चर्चा केली. पाचजणांनी जरीपटका मंडळ हे नाव असावे असे म्हटले, तर तिसरा पर्याय असलेल्या भारतोद्धारक मंडळाला कुणीही मत दिले नाही. २० जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाला समर्थन दिले व तेच नाव अंतिम झाले.

संघस्थापनेनंतर चार वर्षांनी हेडगेवार झाले सरसंघचालक

संघाची स्थापना १९२५ साली झाली असली तरी डॉ. हेडगेवार हे तब्बल चार वर्षांनी सरसंघचालक झाले. सुरुवातीपासून डॉ. हेडगेवार हे मार्गदर्शक होतेच. मात्र १० नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांना स्वयंसेवकांनीच सरसंघचालकपद स्वीकारण्याचा आग्रह केला व तो त्यांनी मान्य केला. बालाजी हुद्दार हे सरकार्यवाह तर मार्तंडराव जोग हे सरसेनापती झाले.

दंड चालविण्यापासून शारीरिक कार्यक्रमांची सुरुवात

संघाच्या कार्यप्रणाली शारीरिक कार्यक्रमांना महत्त्व आहे. याची सुरुवात तत्कालीन इतवार दरवाजा प्राथमिक शाळेत झाली होती. तेथे संघाच्या स्वतःच्या शारीरिक कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. याअंतर्गत अण्णा सोहोनी यांनी दंड चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केले होते.

व्यायामशाळांतून स्वयंसेवकांचा शोध

त्याकाळी नागपूर व्यायामशाळा, महाराष्ट्र व्यायामशाळा येथे अनेक तरुण नियमितपणे जात होते. महाराष्ट्र व बंगालमध्ये व्यायामशाळा लोकप्रिय होत्या. त्यामुळे डॉ. हेडगेवार व त्यांचे सहकारी व्यायामशाळांमध्ये भेटी देऊन तेथील तरुणांना संघाशी जुळविण्यासाठी प्रयत्न करायचे.

१९२६ मध्ये नियमित झाल्या शाखा

आज देशभरात ८३ हजारांहून अधिक ठिकाणी दररोज शाखा लागतात. मात्र संघाची सुरुवात झाली तेव्हा पंथरा दिवसांतून एका स्वयंसेवक भेटायचे. संघाचे पहिले कार्यकारी सचिव रघुनाथराव बांडे यांनी संघाची स्थापना, बैठकीचे विस्तृत विवरण तसेच नामकरणाचे कार्यवृत्त तयार केले होते. ९ मे १९२६ रोजी डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्वयंसेवकांनी १५ दिवसांतून एकदा भेटणे, व्यायामशाळा सुरू करणे या गोष्टी ठरविण्यात आल्या, तर २१ जून १९२६ रोजी अनाथ विद्यार्थी गृहात झालेल्या बैठकीत संघाच्या कार्यप्रणालीवर चर्चा झाली होती. २८ मेपासून मोहितेवाडा येथे संघाची शाखा नागपुरात नियमित लागायला लागली.

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Began Quietly a Century Ago; No Fanfare, No Guests

Web Summary : RSS quietly began in 1925 with a few young men. Initially, it lacked a formal name, later chosen by members. Dr. Hedgewar became leader four years post-establishment. Physical training started in schools and gyms, with regular branches established in 1926.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय