परंपरा अन् ग्लॅमरची आज धमाल
By Admin | Updated: December 1, 2015 06:53 IST2015-12-01T06:53:32+5:302015-12-01T06:53:32+5:30
पारंपरिक कला आणि आधुनिक ग्लॅमर मिलनाचा वार्षिक उत्सव ‘धमाल दांडिया’ची अंतिम फेरी आज, मंगळवार १

परंपरा अन् ग्लॅमरची आज धमाल
नागपूर : पारंपरिक कला आणि आधुनिक ग्लॅमर मिलनाचा वार्षिक उत्सव ‘धमाल दांडिया’ची अंतिम फेरी आज, मंगळवार १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिटणीस पार्क स्टेडियम, महाल येथे रंगणार आहे. लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान प्रस्तुत या सोहळ्याचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेता ‘बाजीराव मस्तानी’ फेम रणवीरसिंह व प्रसिद्ध गायिका साधना सरगम हे आहेत. हा सोहळा रणवीरसिंह यांच्या नृत्याने तर साधना सरगम यांच्या सुरेल गीताने रंगणार आहे; सोबतच स्टार प्रवाह चॅनलमधून सादर होणारी मालिका ‘दुर्वा’ची नायिका रुता दुरगुले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
या सोहळ्याचे सहप्रायोजक स्टार प्रवाह, आयएनआयएफडी, वात्सल्य ग्रुप आणि युनिक स्लीम पॉर्इंट अॅण्ड ब्युटी क्लिनिक आहेत. लोकमत सखी मंचच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची धमाकेदार अंतिम फेरी या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक संघाने सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या प्रथम आणि नंतर उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीत दोन्ही राज्याचे ११ संघ सहभागी झाले होते.