१ लाख ७२ हजार ६५५ विद्यार्थ्यांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:09 AM2019-06-08T00:09:05+5:302019-06-08T00:10:35+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. निकालांसाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. निकाल कधी लागेल याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आता उत्सुकता व धाकधूक अशा दोन्ही भावना पहायला मिळत आहेत. दहावीचा निकाल दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

Today result of 1 lakh 72 thousand 655 students | १ लाख ७२ हजार ६५५ विद्यार्थ्यांचा आज फैसला

१ लाख ७२ हजार ६५५ विद्यार्थ्यांचा आज फैसला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. निकालांसाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. निकाल कधी लागेल याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आता उत्सुकता व धाकधूक अशा दोन्ही भावना पहायला मिळत आहेत. दहावीचा निकाल दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च महिन्यात १० वी परीक्षा घेण्यात आली होती. नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांतून १ लाख ७२ हजार ६५५ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. ६९० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी १९ जून तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी पुढील पाच दिवसात अर्ज करावा लागणार आहे.

 

Web Title: Today result of 1 lakh 72 thousand 655 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.