शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

नागपूरजवळील मोवाडचा आज काळा दिवस; २०४ लोकांना मिळाली होती जलसमाधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 17:53 IST

एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी मोवाडवासियांच्या अंगावर शहारे उभे राहतात. 

सुरभी शिरपूरकर

नागपूर : ३० जुलै १९९१ ची ती पहाट.... आजपासून ठीक ३१ वर्षांपूर्वीची गोष्ट...  नागपूर जिल्ह्याच्या मोवाड येथे ३१ वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात २०४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली असली तरी जखमा मात्र आजही ताज्या आहेत. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापुराने असंख्य वेदना आणि आठवणी आजही कायम आहे. नदीच्या काठावरील १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या नदीत २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती. मोवाडवासी आजचा दिवस  काळादिवस म्हणून पाळतात.

रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. दिवस उजडण्या आधीच संपूर्ण मोवाड गाव जलमग्न झाले होते. कुणालाही सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. त्यादिवशी पाहिल्यांदा मोवाडवासीयांनी वर्धा नदीचे रोद्ररूप बघायला मिळाले होते. त्यानंतर या गावाने अनेक पूर अनुभवले आहेत. मात्र १९९१ च्या महापूराने दिलेल्या असंख्य वेदना आजही कायम आहेत. खवळलेल्या नदीने हजारोंच्या डोळ्यादेखत आपल्या स्नेही जणांना महापुराने कवेत घेत असल्याचे दृश्य आजही अनेकांच्या मनात ताजे आहे.

एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या घटनेत मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे उभे राहतात. 

मोवाड नगरपालिकेची स्थापना १७ मे १८६७ ला झाली. त्याला १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेशच्या सीमेवर मोवाड गाव नरखेड तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर आहे. येथील नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडचा विणकरांची मोठी बाजारपेठ होती, सोबातचं इथली बैलबाजार देखील प्रसिद्ध आहे. येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे, मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे. 

महापूरामुळे जीवनाची घडी बिस्कटल्याची खंत लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येते. या विनाशाला तब्बल ३१ वर्षे पूर्ण होत असल्याने काळाने झडप मोवाडवासीयांवर घातली आणि निष्पाप २०४ लोकांना जलसमाधी मिळाली. म्हणून ३० जुलै रोज शनिवार काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. ती काळरात्र वैऱ्याची ठरली. मृतदेहाचा सडा तीन - चार किलोमीटर पर्यंत पडला होता.  प्राणहाणी, वित्तहाणी मोठ्या प्रमाणात झाली होती, आरडा-ओरड आणि किंचाळ्याने आसमंत दणाणले होते. क्षणात संपूर्ण गाव नेस्तनाबूत झाले.

टॅग्स :Socialसामाजिकfloodपूरnagpurनागपूर