क ाश्मिरी मुलांशी आज संवाद
By Admin | Updated: January 24, 2015 02:20 IST2015-01-24T02:20:00+5:302015-01-24T02:20:00+5:30
भारताच्या अन्य प्रदेशात शांतता असताना पेटलेल्या काश्मीरच्या झळा सोसलेल्या युवकांचे अनुभव व तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न

क ाश्मिरी मुलांशी आज संवाद
नागपूर : भारताच्या अन्य प्रदेशात शांतता असताना पेटलेल्या काश्मीरच्या झळा सोसलेल्या युवकांचे अनुभव व तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न ‘सरहद’ या संस्थेच्यावतीने शनिवारी २४ जानेवारी रोजी धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये दुपारी १२ वाजता आयोजित ‘काश्मीर येथील मुलांशी संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
पुणे येथील ‘सरहद’ संस्थेचे प्रमुख संजय नाहर हे काश्मिरातील दहशत पीडित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करीत आहेत. सरहदच्या माध्यमातून ही मुले पुण्यातील विविध संस्थेत शिक्षण घेत आहेत. रिक्झेन चुंडोल, रुबिना अफ जल मीर, स्टॅझिंग दोरेजे, आशित खान, जाहिद भट, जोगिंदर सिंह यांचा दहशवादाशी झालेला सामना, अनुभव त्यांना आजही अस्वस्थ करतो. काश्मिरात मागील काही दशकांत दहशतीने कहर का माजविला याचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करित असताना देशातील अन्य प्रदेशातील मुलांशी संवाद साधून काश्मिरातील परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न, दहशतवादाचे घाव सोसणारे काश्मिरातील विविध भागातून आलेले हे विद्यार्थी करतील.
काश्मिरातील परिस्थितीची जाणीव देशातील एक कोटी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी असा प्रयत्न करण्यात येत असून या शृंखलेची सुरुवात नागपुरातून होत आहे. या कार्यक्रमादरम्यान आमदार अनिल सोले व प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्ते सहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती निशांत गांधी यांनी पत्रपरिषदेत दिली. (प्रतिनिधी)