लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवान श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून रामभक्त यासाठी सज्ज झाले आहेत. पोद्दारेश्वर राममंदिर व रामनगरच्या राममंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामनवमीच्या या भक्तिमय वातावरणात उपराजधानीला पुन्हा एकदा अयोध्येचे रूप प्राप्त होणार आहे. यानिमित्त मंदिरात स्थापन झालेले घट विसर्जित केले जाणार असून विविध राममंदिरात विशेष आयोजन केले जाणार आहे.पोद्दारेश्वर राममंदिराच्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार रविवारी भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मंदिरात पहाटे ४ वाजता उत्थापन, मंगल आरती, भगवान रामाचा अभिषेक व अभ्यंगस्नान केले जाईल. पहाटे ५ वाजता शहनाई वादन होईल. सकाळी ९ वाजता श्रीरामकृष्ण मठ संकीर्तन मंडळातर्फे कीर्तन सादर करण्यात येईल. दुपारी १२ वाजता भगवान रामाला अभिषेक आणि षोडशोपचार पूजन करण्यात येईल.दुपारी ४ वाजता रथावर विराजमान प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्र्तींचे पूजन महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते केले जाईल. याप्रसंगी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्र सभापती दीपक म्हैसकर, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, अनिस अहमद, रमेश बंग, दीनानाथ पडोळे, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, वीरेंद्र कुकरेजा, तानाजी वनवे आदी उपस्थित राहणार आहेत.आकर्षण ठरेल भगवान रामाचा रथवृंदावन येथील निधीवनाच्या कल्पनेतून महारास सादर करतानाचा भगवान श्रीराम यांचा मुख्य रथ लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या रथाला विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. याशिवाय १०८ भगिनी डोक्यावर कलश घेऊन शोभायात्रेसह चालणार आहेत.पहिल्यांदा फेसबुक लाईव्हशोभायात्रा समितीचे तरुण सदस्य यावर्षी पहिल्यांदा फेसबुकवर शोभायात्रेचे लाईव्ह प्रसारण करणार आहेत. समितीचे वरिष्ठ कार्यकर्ता पुनित पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकांनी फेसबुक लाईव्हसाठी विविध ठिकाण निश्चित केले आहेत.
आज अयोध्याप्रमाणे सजेल उपराजधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:57 IST
भगवान श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून रामभक्त यासाठी सज्ज झाले आहेत. पोद्दारेश्वर राममंदिर व रामनगरच्या राममंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामनवमीच्या या भक्तिमय वातावरणात उपराजधानीला पुन्हा एकदा अयोध्येचे रूप प्राप्त होणार आहे.
आज अयोध्याप्रमाणे सजेल उपराजधानी
ठळक मुद्देरामनवमीच्या शोभायात्रेसाठी रामभक्त सज्ज : जय श्रीरामने दुमदुमणार आकाश