इमामवाड्यात टायरचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST2021-04-10T04:07:19+5:302021-04-10T04:07:19+5:30
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदन नगरात असलेले एक टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी आतमधून एक लाखाची रोकड, सीसीटीव्ही ...

इमामवाड्यात टायरचे दुकान फोडले
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदन नगरात असलेले एक टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी आतमधून एक लाखाची रोकड, सीसीटीव्ही एलईडी आणि डीव्हीआर असा एक लाख, १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
पंकज मुरलीधर राठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चंदन नगर परिसरात त्यांचे टायरचे दुकान आहे. ७ तारखेच्या सायंकाळी त्यांनी दुकान बंद केले नेहमीप्रमाणे ८ एप्रिलला दुकान उघडण्यासाठी सकाळी १० वाजता ते आले असता त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. आतमध्ये पाहणी केली असता चोरट्याने दुकानातील एक लाखाची रोकड, सीसीटीव्ही एलईडी, डीव्हीआर चोरून नेल्याचे उघड झाले.
त्यांनी इमामवाडा पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर चोरून नेला असला तरी त्यांचा लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
---