सिमेंट रस्त्यांनी घटेल टायरचे आयुष्य
By Admin | Updated: June 3, 2017 01:38 IST2017-06-03T01:38:40+5:302017-06-03T01:38:40+5:30
शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे.

सिमेंट रस्त्यांनी घटेल टायरचे आयुष्य
अपघाताचीही भीती : डांबरी रस्त्याच्या तुलनेत टिकणार कमी काळ
धीरज शुक्ला।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. तुम्ही जेवढे वाहन अधिक चालवाल तेवढेच तुमच्या वाहनाच्या टायरचे आयुष्य कमी होत जाईल. डांबरी रस्त्याच्या तुलनेत २०-३० टक्के टायर्स कमी चालतील. तज्ज्ञांच्या मते सिमेंट रोड, डांबर रोडच्या तुलनेत अधिक कडक असतो. तापमानातही सात ते आठ अंशाचा फरक असतो. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते थंड होण्यास तीन ते चार तास अधिक लागतात. गरमी आणि दाब सहन केल्याने घर्षण आणि गरमीमुळे टायर अधिक घासल्या जातात. अधिक दाब आणि गरमीमुळे टायर अचानक फुटू शकतात. वेगवेगळे वाहन आणि आकाराच्या टायर तसेच गुणवत्तेच्या आधारावर तापमान सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. कमाल ५५ ते ६५ डिग्री तापमानच हे टायर सहन करू शकतात.
८९ किलोमीटर रस्त्याचे सिमेंटीकरण
‘लोकमत’ने शहरात किती किलोमीटर रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यात येत आहेत, याची माहिती घेतली. याबाबत महापालिकेच्या बांधकाम कार्य विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तळेवार यांनी सांगितले की, शहरात सिमेंट रस्त्याचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ३० किलोमीटर रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे तयार करण्यात येतील. यात १२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून १८ किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. दुसऱ्या टप्प्यात ५९ म्हणजे एकूण ८९ किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते होतील. अधीक्षक अभियंता तळेवार यानी सांगितले की, डांबराच्या रस्त्यावर देखभालीचा खर्च अधिक येतो. सिमेंटचे रस्ते तयार करण्याचा खर्चही अधिक येतो. परंतु सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी लागणारी किंमत सात वर्षात भरून निघते. त्याचे वयोमान ३५ वर्षे राहते. यामुळे सिमेंटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.
अपघाताचा धोका
गरमीच्या दिवसात डांबर पिघळल्याने वाहन असंतुलित होत नाहीत. परंतु टायरची पकड संपू लागते. रेती, पाणी रस्त्यावर पडलेली असल्यामुळे वाहन रस्त्यावरून घसरते. अशा स्थितीत अपघाताचा धोका डांबर रोडच्या अपेक्षेनुसार सिमेंट रस्त्यावर अधिक वाढतो.
लवचिकपणा नाही
तज्ज्ञांच्या मते डांबरात ‘फ्लेक्सिबिलीटी’ आणि ‘इलास्टिसिटी’ अधिक राहते. सिमेंट रस्त्यावर मजबुती अधिक असते. अशात डांबर कोणत्याची ऋतूत टायरच्या ग्रीपला पकडून ठेवते. परंतु सिमेंट रोडवर संतुलन राखणे कठीण होते. वाहतुकीमुळे सिमेंटचे रस्ते गुळगुळीत होऊन अपघात होतात.
सध्याच नवे तंत्रज्ञान नाही
टायर डिलर्सच्या मते नागपुरात सध्या असे टायर उपलब्ध नाहीत ज्यात सिमेंट रोडसाठी विशेष पद्धतीची डिझाईन किंवा विशेष तंत्रज्ञान वापरले आहे. सामान्यपणे कंपन्या ग्रीपमध्ये थोडा बदल करतात. परंतु एकाच पद्धतीने त्यांना तयार करण्यात येते.
सिमेंटमध्ये अधिक घर्षण
डांबर हे बिटुमॅन या पदार्थामुळे बनत असल्यामुळे त्यात लवचिकता असते. दाब पडल्यास डांबरी रस्ता दबल्या जातो. त्यामुळे टायरवर कमी दाब पडतो. दुसरीकडे सिमेंटचे रस्ते कडक असतात. अशात दाब केवळ टायरवरच पडतो. सिमेंट रोडचे तापमानही सात ते आठ अंश अधिक राहते. सिमेंट रोड उशिराने थंड होतात. घर्षण आणि गरमीमुळे दाबाने टायर गरम होतात. अचानक ब्रेक लावल्यास तापमान वाढते आणि दाबामुळे ते फुटूही शकतात.
- डॉ. श्रीकृष्ण ढाले, उप-प्राचार्य व विभाग प्रमुख,
सिव्हिल इंजिनिअरींग, प्रियदर्शिनी कॉलेज