टिप्परने ‘एसआरपी’च्या ‘एएसआय’ला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:07 IST2021-09-03T04:07:35+5:302021-09-03T04:07:35+5:30

सुरेश गोविंदराव सोनकुसरे (५२, रा. वैशालीनगर) असे मृत सहायक उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोनकुसरे एसआरपी गट क्रमांक १३ मध्ये तैनात ...

Tipper crushed SRP's ASI | टिप्परने ‘एसआरपी’च्या ‘एएसआय’ला चिरडले

टिप्परने ‘एसआरपी’च्या ‘एएसआय’ला चिरडले

सुरेश गोविंदराव सोनकुसरे (५२, रा. वैशालीनगर) असे मृत सहायक उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोनकुसरे एसआरपी गट क्रमांक १३ मध्ये तैनात होते. त्यांची गुरुवारी आठवडी रजा होती. ते मधुमेहाची तपासणी करण्यासाठी मेडिकलला जात होते. सकाळी ११ वाजता ते आपल्या ॲक्टिव्हावर स्वार होऊन हिंगणा टी पॉइंट येथून जात होते. त्या वेळी मुरुमाने भरलेला टिप्पर क्रमांक एमएच ४०, बीजी २७२८ च्या चालकाने सोनकुसरे यांना धडक दिली. सोनकुसरे टिप्परच्या मागच्या चाकात आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांची गर्दी घटनास्थळी जमली आणि तणाव निर्माण झाला. चालक टिप्पर सोडून पळून गेला. प्रतापनगरचे सहायक उपनिरीक्षक अनिल ब्राह्मणकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सोनकुसरे यांचा मृतदेह मेडिकलला शवविच्छेदनासाठी पाठविला. सोनकुसरे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

...........

Web Title: Tipper crushed SRP's ASI