शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बालभारतीच्या पुस्तकात काळाशी सुसंगत नवे बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:53 IST

घोकमपट्टीला लगाम लावत कृतिशील अभ्यासक्रमाची पेरणी यावेळी बालभारतीच्या पुस्तकात दिसून येत आहे. भाषेच्या पुस्तकात व्यावहारिकता आणली आहे. सोपी भाषा, आकर्षक रंगसंगती आणि काळाशी सुसंगत असा बदल बालभारतीने यंदा पुस्तकात केला आहे. यावर्षी पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात सर्व विषय हे कृतिशील केले आहे.

ठळक मुद्देव्हीज्युलायझेशनवर विशेष भर : अभ्यासक्रमात आणलीय व्यावहारिकता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घोकमपट्टीला लगाम लावत कृतिशील अभ्यासक्रमाची पेरणी यावेळी बालभारतीच्या पुस्तकात दिसून येत आहे. भाषेच्या पुस्तकात व्यावहारिकता आणली आहे. सोपी भाषा, आकर्षक रंगसंगती आणि काळाशी सुसंगत असा बदल बालभारतीने यंदा पुस्तकात केला आहे. यावर्षी पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात सर्व विषय हे कृतिशील केले आहे.काळानुरूप झालेले बदल, लैंगिक असमानतेचे मागासलेपण मागे टाकत घरातील आई कशी मॉर्डन झाली आहे, तिचे अस्तित्व चूल आणि मूल न राहता ती आता कॉम्प्युटरवर बसून कशी आॅनलाईन साहित्याची खरेदी करते आहे, अशा प्रकारचे अनेक चांगले बदल झाल्याचे जाणवते आहे. विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी भाषा, एखादी भूतकाळातील गोष्ट समजावण्यासाठी वर्तमान काळातील उदाहरणांचा केलेला वापर, टेक्नोलॉजी, इंटरनेट आदींचा दिलखुलास वापर या पुस्तकांमध्ये केलेला पहायला मिळत आहे. भूगोलाच्या पुस्तकात त्या देशाची आर्थिक, सामाजिक माहिती, लोकसंख्या, खनिज संपत्ती, नैसर्गिक साधने आदी माहिती दिली आहे.गणिताच्या पुस्तकात नव्याने आलेल्या जीएसटीची माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच शेअर्स, डिबेंचर्स, डिमॅट अकाऊंट काय असते, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज, विमा अशा सर्व संकल्पनांची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यशास्त्राच्या पुस्तकात सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच इंग्रजीच्या पुस्तकात व्यावहारिक भाषेचा समावेश केला आहे. रेल्वेचा फॉर्म कसा भरावा, ईमेल कसा करावा, व्यावहारिक संभाषण आदीला महत्त्व दिले आहे. यावर गुणसुद्धा आहे.नवीन पुस्तकाची वैशिष्ट्ये

  •  सर्व पुस्तकांमध्ये क्यू आर कोड छापण्यात आला आहे.
  •  या पुस्तकांमध्ये भरपूर छायाचित्रांचा वापर केला आहे.
  •  डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक आणि सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणार
  • शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर
  •  मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन सोपे

यंदा प्रथमच बालभारती पाठ्यपुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाची मूल्यमापन पद्धती कशी असेल याबाबतचा तपशील देणारी पुस्तिका देणार आहे. सर्व भाषा तसेच भाषेतर विषयांसाठी स्वतंत्र अशा मूल्यमापन पुस्तिकांची निर्मिती बालभारतीने केली आहे. या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयाची ओळख, विषययोजना, कृतिपत्रिका, प्रश्नपत्रिका यांचे स्वरूप व निर्मितीचे निकष आणि त्याद्वारे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे. यामुळे दहावीच्या परीक्षेत नेमके काय येणार याचा तपशील विद्यार्थ्यांना या पुस्तिकेच्या आधारे मिळू शकणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. नागपूर विभागात ५२ लाख ६३ हजार पुस्तकांचा पुरवठासर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून यंदा ५२ लाख ६३ हजार २१४ पुस्तकांची मागणी आली होती. २३ जूनपूर्वी या सर्व पुस्तकांचा पुरवठा करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातून सांगण्यात आले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण