यंदा साबुदाणा स्वस्त : सणांमध्ये जास्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:20 AM2018-08-22T00:20:17+5:302018-08-22T00:23:45+5:30

यावर्षी तामिळनाडू राज्यात रताळीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साबुदाणा स्वस्त आहे. गेल्यावर्षीच्या ८० रुपयांच्या तुलनेत यंदा उच्च प्रतिच्या साबुदाण्याचे भाव ठोकमध्य ५० ते ५३ रुपयांवर तर रिटेलमध्ये प्रति किलो ६० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.

This time tapioca is cheap: the high demand for festivals | यंदा साबुदाणा स्वस्त : सणांमध्ये जास्त मागणी

यंदा साबुदाणा स्वस्त : सणांमध्ये जास्त मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे गेल्यावर्षीच्या तुलनेत घट


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी तामिळनाडू राज्यात रताळीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साबुदाणा स्वस्त आहे. गेल्यावर्षीच्या ८० रुपयांच्या तुलनेत यंदा उच्च प्रतिच्या साबुदाण्याचे भाव ठोकमध्य ५० ते ५३ रुपयांवर तर रिटेलमध्ये प्रति किलो ६० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
इतवारीतील साबुदाण्याचे ठोक विक्रेते व्ही. ट्रेडिंग कंपनीचे संचालक अरविंद पटेल यांनी सांगितले की, इतवारीत दर्जानुसार साबुदाण्याचे भाव ४० ते ५३ रुपयांदरम्यान आहे. दोन महिन्यांच्या तुलनेत प्रति किलो ६ ते ७ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ग्राहकांना कमी भावातच मिळत आहे. उपवासात साबुदाणा आणि भगरचे सर्वाधिक महत्त्व आहे. नेहमीपेक्षा उपावासात साबुदाण्याची विक्री १५ ते २० टक्के वाढते. पटेल म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून इतवारी मुख्य बाजारात साबुदाण्याचा व्यवसाय कमी झाला आहे. पूर्वी नागपुरातून संपूर्ण विदर्भात विक्री व्हायची. पण प्रत्येक जिल्हास्तरावर ठोक व्यापारी संघटित होऊन मालाची खरेदी करीत असल्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. शिवाय पॅकिंगला ग्राहकांची असलेली पसंती हेसुद्धा एक कारण आहे. इतवारीत साबुदाण्याचा ठोक व्यवसाय करणारे १० ते १२ व्यापारी आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता महिन्याला १७ ते २० ट्रकची (एक ट्रक २१ टन) आवक आहे. व्यापारी नागपूर जिल्ह्यातच विक्री करीत आहेत. चातुर्मासात जास्त मागणी असल्याचे पटेल यांनी सांगितले.
सेलममध्ये सर्वाधिक उत्पादन
तामिळनाडूच्या सेलम आणि लगतच्या भागात रताळीवर प्रक्रिया करून साबुदाणा निर्मितीचे सर्वाधिक कारखाने आहेत. या ठिकाणांहून देशात सर्वत्र साबुदाण्याची विक्री होते. रताळे हे कृषी उत्पादन आहे. त्यावर प्रक्रिया करून साबुदाण्याची निर्मिती करण्यात येत असल्यामुळे ५ टक्के जीएसटीची आकारणी होते. पूर्वी या मालावर ६ टक्के व्हॅट आकारला जायचा. त्यात एक टक्का घट झाली आहे.

Web Title: This time tapioca is cheap: the high demand for festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.