कुलींवर पावसात भिजण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:26+5:302021-06-27T04:06:26+5:30
नागपूर : पावसाळ्यात नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींना पावसात भिजावे लागते. उभे राहण्यासाठी शेडच नसल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. रेल्वे ...

कुलींवर पावसात भिजण्याची वेळ
नागपूर : पावसाळ्यात नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींना पावसात भिजावे लागते. उभे राहण्यासाठी शेडच नसल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाने कुलींसाठी शेड उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कुली करीत आहेत. परंतु, प्रशासनाने कुलींच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर १४५ कुली दोन शिफ्टमध्ये काम करतात. कुलींना रेल्वे प्रशासनाने रेस्ट रूम दिली आहे. परंतु, त्यांना जेथे प्रत्यक्षात काम करावे लागते, तेथे काहीच व्यवस्था नाही. तळपत्या उन्हात त्यांना प्रवाशांची वाट पाहत उभे राहावे लागते. पावसाळ्यातही त्यांना उभे राहण्यासाठी शेड नसल्यामुळे पावसात भिजावे लागते. त्यामुळे कुलींच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. कुलींना कामाच्या ठिकाणी शेड बांधून देण्याची मागणी मागील १० वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येत आहे. परंतु, आजपर्यंत त्यांच्या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही. शेड नसल्यामुळे कुलींची गैरसोय होत असून कुलींना तातडीने ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी शेड बांधून देण्याची मागणी होत आहे.
..............
१० वर्षांपासून शेडची मागणी अपूर्ण
‘नागपूर रेल्वेस्थानकावर १४५ कुली दोन शिफ्टमध्ये काम करतात. कुलींना ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी शेड बांधून देण्याची मागणी मागील १० वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु, अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. शेड नसल्यामुळे कुलींना गैरसोयीचा सामना करावा लागत असून रेल्वे प्रशासनाने तातडीने शेड बांधून देण्याची गरज आहे.’
-अब्दुल माजीद शेख, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे भारवाहक संघ
..........