शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

१२०० किडरोग सर्वेक्षकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:42 PM

किडरोग सर्वेक्षकांचे काम कृषी विभागातील कृषी सहायक यांच्यावर देण्यात आल्याने राज्यातील १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा हा निर्णय तात्काळ रद्द करून क्रॉपसॅप-हॉर्टसॅप प्रकल्पातील किडरोग सर्वेक्षकांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी किडरोग सर्वेक्षक संघटनेने विधिमंडळावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देराज्य तांत्रिक कृषी किडरोग सर्वेक्षक संघटनेचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किडरोग सर्वेक्षकांचे काम कृषी विभागातील कृषी सहायक यांच्यावर देण्यात आल्याने राज्यातील १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा हा निर्णय तात्काळ रद्द करून क्रॉपसॅप-हॉर्टसॅप प्रकल्पातील किडरोग सर्वेक्षकांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी किडरोग सर्वेक्षक संघटनेने विधिमंडळावर मोर्चा काढला.या मोर्चाचे नेतृत्व यशवंत शेंडगे, अमोल बिराजदार, उमेश रसाळ, सागर पाटील, रवींद्र लोकरे, विकास देशमुख, सचिन गायकवाड आदीननी केले.राज्यातील ३६ जिल्ह्यातील किडरोग सर्वेक्षक सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, भात, चिकू, डाळिंब, केळी, संत्री, आंबा व इतर फळांवरील किडरोग सर्वेक्षण व संनियंत्रण सल्ला प्रकल्प म्हणजे ‘क्रॉपसॅप-हॉर्टसॅप’ अंतर्गत २००९ पासून शेतकऱ्यांच्या सेवार्थ कार्य करीत होते. या योजनेला ‘ई-गव्हर्नस’ पुरस्कार प्राप्त आहे. मात्र, शासनाने १९ मे २०१८ रोजी शासन निर्णय घेत सर्वेक्षकांना कामावरून कमी करून त्यांची कामे कृषी सहायक यांच्याकडे दिली. परिणामी, १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले. सर्वेक्षकांनी सलग नऊ वर्षे सेवा दिल्यानंतर आता हाती दुसरे कुठले काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. किडरोग सर्वेक्षकांना कामावर परत घेण्याची मागणी असल्याचे मोर्चाच्या शिष्टमंडळाने सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा