लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या छाव्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला. हा छावा ५ मार्चपासून महाराष्ट्र व मध्य प्रदेशचा सीमाभाग असलेल्या पिवरथडी परिसरात एकटाच फिरत असल्याचे आढळले होते. तेव्हापासून त्याच्यावर कॅमेराद्वारे लक्ष ठेवल्या जात असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे. ९ मार्चलाही तो फिरत असल्याचे दिसले. दोन्ही राज्यातील वनविभागाचे कर्मचारी या बछड्याची वाघिणीसोबत भेट व्हावी यासाठी प्रयत्न करीत होते. शनिवारी मात्र तो दिसेनासा झाला. आईसोबत भेट होणार नाही अशी खात्री बाळगता व त्याच्या प्रकृतीचा विचार करता वनविभागाच्या पथकाने रविवारी शोधमोहिम सुरू केली. यादरम्यान वनपरिसरातील दाट गवतामध्ये त्याचा मृतदेह आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:30 IST
आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला.
पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा मृत्यू
ठळक मुद्दे आईपासून ताटातूट झाल्याचा अंदाज