शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘टायगर हिल’ने दिली लढण्याची जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:38 IST

उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची.

ठळक मुद्देकारगील युद्धात जवानांनी अनुभवले देशाचे पाठबळ : युद्धभूमी आठवताच आजही अंगावर रोमांच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची. कारगील विजय दिवसानिमित्त रोमांचक आठवणींना उजाळा देत असताना त्यांच्या चेहºयावरील उत्साह व डोळ्यातील भावनाच सर्वकाही सांगून जात होत्या. सैन्याच्या नियमांप्रमाणे नाव समोर येऊ नये या अटीवर त्यांनी प्रत्यक्ष युद्धामधील अनुभवांचे कथन केले.युद्धाच्या अखेरच्या क्षणात आमचे लक्ष्य ‘टायगर हिल’ हेच होते. तोफगोळ्यांचा ‘टायगर हिल’वर मारा करण्यात येत होता व वायुसेनेच्या विमानांनीदेखील आकाशातून मारा सुरू केला. त्यावेळी ‘टायगर हिल’ तोफगोळ्यांच्या माºयांमुळे अक्षरश: लाल झाल्यासारखी भासत होती. ज्या वेळी विजय मिळाला त्यावेळी सर्वांनाच आयुष्यभर पुरेल इतके समाधान लाभले होते. तो थरार, रोमांच मी अनुभवला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी आठवण संबंधित जवानाने सांगितली.तोफखाना पथकाने दिला आधारकारगील युद्धाला सुरुवात झाल्यानंतर नेमका शत्रू कुठे आहे, याचा अंदाज येत नव्हता. वातावरणदेखील प्रतिकूल झाले होते. ‘स्नो-फॉल’मुळे कडाक्याची थंडी होती अन् मोजकेच कपडे असल्यामुळे वर चढण्यास अडचणी येत होत्या. आधार होता ते तोफखान्याच्या पथकाचा. त्यांच्याकडून शत्रूवर मारा सुरू होता व त्याच्या ‘कव्हर’मध्ये आम्ही वर चढण्याचा प्रयत्न करत होतो. कारगील युद्धाच्या सुरुवातीला आम्हाला संदेश आला की लाडू आणि बर्फीचे ट्रक येत आहेत. सुरुवातीला नेमके काय होत आहे कळालेच नाही. परंतु ज्यावेळी ट्रक प्रत्यक्षात आले तेव्हा त्यात तोफखान्याला लागणारा दारूगोळा होता.देशाचे भरभरून प्रेम मिळालेसीमेवर लढणाºया जवानांबाबत सामान्यांना काहीही घेणे-देणे नसते, अशी ओरड असते. मात्र आम्हाला आजपर्यंत असा कधीही अनुभव आला नाही. कारगील युद्धात आम्हाला सुरुवातीला जेवणाची अडचण गेली होती, मात्र नंतर देशभरातून मदत आली. डोळ्यासमोर सहकारी शहीद होत असतानादेखील नागरिकांच्या प्रेमातूनच आत्मविश्वास कायम राहिला, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनnagpurनागपूर