शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील बिहाडा खाणीत वाघाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:00 IST

रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीच्या खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देरामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट मधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (रामटेक) : रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीच्या खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. वाघाचा मृतदेह खाणीमधून काढण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू आहेत. रविवारी या वाघाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाघ बुडाला तो खाणीचा खड्डा ५५ फूट खोल असून त्यामध्ये २५ फूट पाणी असल्याचे सांगण्यात येते. रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत संरक्षित वनक्षेत्रात इंग्रजांच्या काळात मॅगनीजच्या खाणी अस्तित्वात होत्या. त्या काळात जंगलातील या खाणीमधून मॅगनीज काढले जायचे. परंतु केलेले खड्डे बुजविले न गेल्याने ते आजही अस्तित्वात आहे. या खड्ड्यांमध्ये बाराही महिने पावसाचे पाणी साचून असते. अशाच एका खड्ड़्यात मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये बिहाडा खाणीत शनिवारी पट्टेदार वाघ मृतावस्थेत पाण्यावर तरंगत असलेला दिसून आला. वनरक्षक राजीव उईके, वनमजूर भोंडेकर आणि क्षेत्रसहायक श्रीकांत चौगुले हे गस्तीवर असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. या चमूने रामटेकचे वनपरिक्षेत्राधिकारी रवींद्र शेंडे यांना ही माहिती दिली. वरिष्ठांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली असता सहायक वनसंरक्षक संदीप गिरी, मानद वन्यजीवसंरक्षक कुंदन हाते तसेच रामटेक वनपरिक्षेत्राधिकारी रवींद्र शेंडे घटनास्थळी दाखल झाले.वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे यांच्यानुसार सदर वाघ शिकारीसाठी एखाद्या जनावराच्या मागे जोरात धावला असेल व अंदाज न आल्याने तो घसरुन खाणीतील पाण्यात पडला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. वाघाच्या अंगावर काही जखमा देखील आढळल्याचे शेंडे यांनी सांगितले. सदर घटना एक ते दोन दिवस अगोदरची असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वाघाचे नेमके वय किती असावे याविषयी त्यांनी असा अंदाज वाघ पाण्यात फुगल्याने करता येत नसल्याचे सांगीतले. रविवारी या मृत वाघाची उत्तरीय तपासणी केली जाईल. उत्तरीय तपासणीनंतरच तथ्य बाहेर येईल. वन्यप्राण्यांच्या अपघातांना निमंत्रण देणारे खाणींचे हे खड्डे स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षात बुजविणे शक्य नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूnagpurनागपूर