राष्ट्रीय आदर्श विद्यालयात व्याघ्र दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:16+5:302021-07-31T04:09:16+5:30
पारशिवनी: निसर्गचक्रात ‘वाघ’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सद्य:स्थितीत वाघाचे अस्तित्व आणि धोके लक्षात घेत नवेगाव खैरी येथील राष्ट्रीय ...

राष्ट्रीय आदर्श विद्यालयात व्याघ्र दिवस
पारशिवनी: निसर्गचक्रात ‘वाघ’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सद्य:स्थितीत वाघाचे अस्तित्व आणि धोके लक्षात घेत नवेगाव खैरी येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फेस पेंटिंग, स्लाइड शो, प्रश्नमंजूषा, चित्रकला, मानव-वन्यप्राणी सहजीवन प्रदर्शनी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक व्याघ्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला बीएनएचएसचे सहाय्यक संचालक संजय करकरे, संपदा करकरे आणि मुख्याध्यापिका एस.जे.जांभूळकर, केंद्रप्रमुख चंद्रशेखर दलाल, ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदूळकर, प्रा. अरविंद दुनेदार उपस्थित होते. सूरज घोगरे, जगदीश धारणे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून वाघाला मदतीचा हात कसा देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक साक्षोधन कडबे यांनी केले. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक दिलीप पवार, अमित मेश्राम, निसर्गदूत नीरज राऊत, दिव्यानी रामटेके, रजनी कामडे, सुरक्षा गोरले यांनी परिश्रम घेतले.