शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

... तर नागपूर शहराच्या दिशेनेही येऊ शकतो वाघ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:32 AM

मागील १५-१६ दिवसांपासून मिहान परिसरात फिणाऱ्या वाघाचे नागरिकांमध्ये एवढे  आकर्षण वाढले आहे की, तो कुठेतरी दिसेल या अपेक्षेने लोक आता मिहानच्या दिशेने जायला लागले आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांचा वाढलेला हस्तक्षेप वनविभागासाठी डोकेदुखीचा विषय ठतला आहे.

ठळक मुद्देवनाधिकारी, व्याघ्रअभ्यासकांनी व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील १५-१६ दिवसांपासून मिहान परिसरात फिणाऱ्या वाघाचे नागरिकांमध्ये एवढे  आकर्षण वाढले आहे की, तो कुठेतरी दिसेल या अपेक्षेने लोक आता मिहानच्या दिशेने जायला लागले आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांचा वाढलेला हस्तक्षेप वनविभागासाठी डोकेदुखीचा विषय ठतला आहे. मात्र नागरिकांनी हा प्रकार थांबविला नाही तर वाघच आता शहराकडे येऊ शकतो, अशी भीती व्याघ्र अभ्यासकांनी आणि वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.सोमवारी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या चर्चेमध्ये सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी गिरीष वशिष्ठ, नागपूरचे मानद वनजीव रक्षक कुंदन हाते, महाराजबाग प्राणीसंगहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर, सृष्टी पर्यावरण मंडळाचे विनित अरोरा सहभागी झाले होते. मिहानमधील ज्या परिसरात वाघ सध्या दिसत आहे, तो भाग नेहमीच वाघाचा अधिवास राहिलेला आहे. परिसरातील अनेकांनी या ठिकाणी बरेचदा वाघ पाहिला आहे. मात्र शहरी नागरिक या परिसरात अनभिज्ञपणे वाघाला पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. हा प्रकार थांबला नाही तर वाघ आपला अधिवास बदलून शहराच्या दिशेने येऊ शकतो, अशी शक्यता या वेळी वर्तविण्यात आली.मानवी वस्तीला वाघ टाळतोयंसध्या वाघ ज्या परिसरात फिरत आहे त्यावरून एक लक्षात येते, तो मानवी वस्तीला टाळण्याचाच प्रयत्न करीत आहे. गुमगावच्या दिशेने निघाल्यानंतर तो पुन्हा मिहानकडे परत फिरला. खडका गावालगत वाहणाऱ्या वेणा नदीच्या किनाऱ्यावरून तो पुढे निघाला. याचा अर्थच असा की, नदी पार करून तो कॅन्सर हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या झाडांमधूनच पुढे निघाला.वाघाचे उपवासी राहणे धोकादायकवाघ अधिक काळ उपवासी राहणे धोकादायक असते. त्याने एखादी शिकार केली असेत तर ती त्याने खाणेच सर्वाच्या दृष्टीने हिताचे असते. कारण एक शिकार खाल्ल्यानंतर वाघ साधारणत: ७ ते ८ दिवस काहीही न खाता राहू शकतो. मात्र शिकार करूनही ती खाण्याची संधी त्याला मिळाली नाही तर तो ताबडतोब दुसरी शिकार करतो. साधारणत: असेही असते की वाघाचे पोट भरल्यावरच तो पुढच्या प्रवासाला निघतो. ७-८ दिवसपर्यंत तो बराच दूरवर चालत जातो. मात्र तो उपवासी असेल तर शिकार करण्याची शक्यता अधिक वाढते.शहराच्या भोवताल फिरताहेत सहा बिबटेअलिकडेच काही दिवसांपूर्वी शहराच्या वायुसेना नगर परिसरात बिबट्या पाहण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांनीच अंबाझरी बायो डायवर्सिटी पार्कमध्ये त्याचे पगमार्क दिसले. त्यावरून आता बऱ्याच चर्चा सुरू आहेत. वन अधिकाऱ्यांच्या मते, आजच्या तारखेत शहराच्या भोवताल एक नवहे तर चक्क सहा बिबटे खुलेआमपणे फिरत आहेत. २२ बिबटे गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात बंद आहेत. बिबट्यांची संख्या वेगाने वाढत असल्याने ते हल्ली शहरालगतच्या मानवी वस्तीजवळ फिरायला लागले आहेत. कुत्रा हे बिबट्यांचे आवडीचे खाद्य आहे. शहरात अलिकडे वेगाने कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याच्या मागोव्यावरच बिबटे शहरालगतच्या परिसरात फिरायला लागले आहेत. अद्याप तरी बिबट्यांनी कुण्या कुत्र्याची शिकार केल्याची बातमी कानावर आलेली नाही, ही समाधानाची बाब समजली जावी, असे या अभ्यासकांनी सांगितले.अमरावती रोड क्रॉस करूनच बिबट्या पोहचला पार्कमध्येतज्ज्ञांच्या मते, शहरातील वायुसेना नगर परिसर दिसलेला बिबट्याच नंतर अमरावती रोड ओलांडून अंबाझरी बायोडायवर्सिटी पार्कमध्ये पोहचला. पार्कमधील हा बिबट अमरावती रोड ओलांडून ग्लोरीजवळून बागेकडे पोहचला असावा, अशी शक्यता आहे. या ठिकाणी वनविभागाने अंबाझरी पार्कचे एक गेट बनविले आहे. येथूनच पार्कमध्ये बिबट्याने शिरकाव केल्याची शक्यता या अभ्यासकांकडून वर्तविल्यात आली.वाघोबाच्या शोधासाठी ताडोबातील फाईलींची तपासणीनागपूर शहरानजीकच्या मिहान परिसरात मागील १५ दिवसांपासून फिरणारा वाघ नेमका आहे तरी कुठला, या पडताळणीसाठी वनविभाग कामी लागला आहे. मिहान परिसरात फिरणारा वाघ ताडोबातून तर आला नसावा, ही शंका गृहित धरून येथे लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये दिसलेल्या वाघाची छायाचित्रे नागपूर वन विभागाने शनिवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे पाठविली आहेत. आजपर्यंत तीन छायाचित्रेच नागपूर वन विभागाला मिळाली आहेत. या तिन्ही छायाचित्रांची पडताळणी तेथील वाघांच्या फाईलमधील छायाचित्रांसोबतकेली जात आहे.मिहानमध्ये फिरणाºया या वाघाची ओळख पटविण्यासाठी वन विभागाने बोरसह लगतच्या आरक्षित वनक्षेत्रातील कार्यालयांकडे या वाघाची छायाचित्रे आणि पगमार्कची माहिती यापूर्वी पाठविली होती. मात्र त्यांच्याकडून आलेली माहिती मिहानमधील वाघाच्या छायाचित्रशी आणि पगमार्कशी जुळली नाही. त्यामुळे आता नागपूर वन विभागाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे माहिती पाठविली आहे.जुन्या फाईलींमध्ये शोध सुरूवन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहानमध्ये फिरणाऱ्या वाघाची ओळख पटविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. ताडोबामध्ये पाठविण्यात आलेल्या छायाचित्रांचा आधार घेऊन तेथील वन अधिकारी आता जुन्या फाईलींमध्ये या वाघाचा शोध घेत आहेत.गरज पडल्यास पिंजऱ्यातही बंद करणारमिहानमधील वाघाने अद्याप कसलीही उपद्रवी घटना घडविली नाही. त्यामुळे तशी वेळ आलीच तर त्याला पिंजरे लावूनही पकडले जाईल, असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या त्याला ताबडतोब पकडण्याची गरज नसून त्याच्या सर्व हालचालीवर बारील लक्ष ठेवले जात आहे. ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याची सर्व माहिती गोळा केली जात आहे. योग्य वेळ येताच त्याला पकडले जाईल, असे वनविभागाचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :TigerवाघMihanमिहान