कऱ्हांडलाच्या जंगलात उपाशी फिरताहेत वाघाचे बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:24+5:302021-03-17T04:08:24+5:30
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील टी-१ वाघिणीच्या एका बछड्याचा वाघाच्या हल्लात मृत्यू झाला होता. त्याला सूर्या (टी-९) या वाघाने ठार ...

कऱ्हांडलाच्या जंगलात उपाशी फिरताहेत वाघाचे बछडे
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील टी-१ वाघिणीच्या एका बछड्याचा वाघाच्या हल्लात मृत्यू झाला होता. त्याला सूर्या (टी-९) या वाघाने ठार केल्याचा अंदाज आहे. यानंतर आता वाचलेले आणि आईपासून विभक्त झालेले दोन बछडे कऱ्हांडलाच्या जंगलात उपाशीपोटी फिरत आहेत.
मंगळवारी दुपारी २.३० वाजता हा प्रकार निदर्शनास आला. येथील कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचा एक बछडा अगदी अशक्त अवस्थेत दिसला तर याच दिवशी सकाळी दुसऱ्याचे पगमार्क दिसले. यावरून हे दोन्ही बछडे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र मागील ४ ते ५ दिवसांपासून त्यांनी काहीच खाल्लेले नसल्याने ते अत्यंत अशक्त असल्याचे निदर्शनास आल्याने चिंता व्यक्त होत आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाचे बछडे किमान वर्षभर आपल्या आईसोबत राहून शिकारीचे तंत्र अवगत करतात. मात्र ही पिले फक्त सहा ते सात महिन्यांचीच आहेत. यामुळे स्वत: शिकार करून पोट भरणे त्यांना शक्यच नाही. त्यांची आई टी-१ ही वाघीण आणि सूर्या वाघ एकत्र फिरताना दिसले आहेत. सूर्या यालाही कऱ्हांडलाच्या बीट क्रमांक १४१५च्या जवळपास पाहण्यात आले होते. यानंतर वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला होता.
वाघिणीचे दोन्ही बछडे सुरक्षित असण्यावर वनविभागाचे शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे त्यांच्या शोधावर आता संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
...
अन्य प्राण्यांपासून धोका
या जंगलात रानकुत्र्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा तर कुत्र्यांमुळे वाघांना आपला अधिवास बदलण्याची पाळी आली आहे. अशा परिस्थितीत अशक्त बछड्यांसमोरील धोका अधिक वाढला आहे. अन्य प्राण्यांपासूनही धोका कायम आहे.
...