वाघाचा गोठ्यातील गाईवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST2021-03-23T04:09:30+5:302021-03-23T04:09:30+5:30

भिवापूर : धामणगाव (गवळी) येथे रविवारी मध्यरात्री वाघाने प्रवेश करत घराला खेटून असलेल्या गोठ्यातील गाईवर हल्ला करीत तिला ठार ...

A tiger attacks a cow in a barn | वाघाचा गोठ्यातील गाईवर हल्ला

वाघाचा गोठ्यातील गाईवर हल्ला

भिवापूर : धामणगाव (गवळी) येथे रविवारी मध्यरात्री वाघाने प्रवेश करत घराला खेटून असलेल्या गोठ्यातील गाईवर हल्ला करीत तिला ठार मारले. ही घटना तालुक्यातील धामणगाव (गवळी) येथे सोमवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली.

प्राप्त माहितीनुसार यादव गुरुले यांचा गावात घराशेजारी गोठा आहे. रविवारी सायंकाळी शेतातून आल्यानंतर यादव यांनी गाय, म्हैस व कालवड अशी सात जनावरे गोठ्यातील दावणीला बांधली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने गावात प्रवेश करत घराशेजारील गोठ्यातील जनावरांवर हल्ला केला. यात एक गाय मृत पावली, मात्र अन्य जनावरांना कुठलीही दुखापत झाली नाही. पहाटेच्या सुमारास जनावरांचा हंबरण्याचा मोठा आवाज येत असल्याने यादव गुरुले यांनी गोठ्यात जाऊन बघितले असता ही बाब उजेडात आली. याबाबत त्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या घटनेत गुरुले याचे अंदाजे ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: A tiger attacks a cow in a barn