पत्नीविरोधात तिकीट नाकारले, माजी महापौरांचा भाजपाला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST2021-03-17T04:07:31+5:302021-03-17T04:07:31+5:30
कोलकाता - उमेदवारी नाकारल्याच्या मुद्यावरून नाराज झालेले माजी महापौर सोवन चॅटर्जी व बैसाखी बॅनर्जी यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ...

पत्नीविरोधात तिकीट नाकारले, माजी महापौरांचा भाजपाला रामराम
कोलकाता - उमेदवारी नाकारल्याच्या मुद्यावरून नाराज झालेले माजी महापौर सोवन चॅटर्जी व बैसाखी बॅनर्जी यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांना बेहला पूर्व या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून तिकीट हवे होते. मात्र तेथून तृणमूलकडून त्यांच्या पत्नी उभ्या असल्याने सोवन यांना उमेदवारी देण्यास पक्षनेतृत्वाने नकार दिला. चॅटर्जी २०१९ मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते.
भाजपने चॅटर्जी यांना बेहला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी दाखविली होती, तर बैसाखी बॅनर्जी यांना तिकीट नाकारले होते. तृणमूल काँग्रेसने चॅटर्जी यांची पत्नी रत्ना यांना बेहरा पूर्व येथून उभे केले आहे. त्यामुळे तेथे दावा असतानादेखील सोवन यांना तिकीट देण्याचे भाजपने टाळले. पती-पत्नीचा सामना टाळायचा असल्याने सोवन यांना दुसऱ्या जागेवरून लढण्यास सांगण्यात आले होते, असे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले.