शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

उपराजधानीत ठकबाजांनी लावला ६६० कोटींहून अधिकचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 8:41 PM

गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीत आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १० वर्षांत नागपुरात १७८ आर्थिक घोटाळे झाले. यातील ८६ घोटाळे ५० लाखांहून अधिक रकमेचे होते व यात ठकबाजांनी नागपूरकरांना ६६० कोटींहून अधिक रकमेचा चुना लावला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांत ५० लाखांहून अधिक रकमेचे ८६ घोटाळे : ३५ टक्के आरोपीच अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षांपासून नागपूर उपराजधानीत आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १० वर्षांत नागपुरात १७८ आर्थिक घोटाळे झाले. यातील ८६ घोटाळे ५० लाखांहून अधिक रकमेचे होते व यात ठकबाजांनी नागपूरकरांना ६६० कोटींहून अधिक रकमेचा चुना लावला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलीस गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. २००८ सालापासून नागपुरात किती आर्थिक घोटाळे झाले, यात ५० लाखांहून अधिक रकमेचे किती घोटाळे होते व नेमकी किती रक्कम गुंतली होती, या घोटाळ्यांसाठी किती लोकांवर कारवाई झाली व किती जणांना अटक झाली, नेमकी किती रक्कम परत मिळाली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २००८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत नागपुरात एकूण १७८ घोटाळे झाले. त्यातील ४८ टक्के घोटाळे हे ५० लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे होते. या घोटाळ्यात गुंतलेल्या रकमेचा आकडा ६६० कोटी ७५ लाख २५ हजार २९८ इतका आहे. यापैकी २३५ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम परत मिळविण्यात गुन्हे शाखेला यश आले. याची टक्केवारी अवघी ३५ टक्के इतकीच आहे.२०९ आरोपी फरारच१० वर्षांच्या कालावधीत ५० लाखांहून अधिक रकमेच्या घोटाळ्यात गुंतलेल्या आरोपींची एकूण संख्या ३२४ इतकी आहे. मात्र यापैकी केवळ ११५ आरोपींनाच अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. अटक करण्यात आलेल्यांची टक्केवारी ही अवघी ३५ टक्के असून २०९ आरोपी मोकाटच आहेत.२०१४ मध्ये सर्वाधिक फटका५० लाखांहून अधिक रकमेचे सर्वाधिक १८ आर्थिक घोटाळे २०१६ साली नोंदविण्यात आली व यात ८९ लाख ६१ लाख ११ हजार ७५० रुपयांची रक्कम समाविष्ट होती. मात्र २०१४ साली अवघ्या १० घोटाळ्यामध्ये ठकबाजांनी २३४ कोटी ९५ लाख ६९ हजार ५१० रुपयांचा चुना लावला.

टॅग्स :fraudधोकेबाजीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता