लैंगिक स्पर्श करणाऱ्यास तीन वर्षे कारावास

By Admin | Updated: March 22, 2017 02:52 IST2017-03-22T02:52:41+5:302017-03-22T02:52:41+5:30

सत्र न्यायालयाने शाळकरी मुलीला लैंगिक स्पर्श करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास.....

Three years imprisonment for a sexually touching person | लैंगिक स्पर्श करणाऱ्यास तीन वर्षे कारावास

लैंगिक स्पर्श करणाऱ्यास तीन वर्षे कारावास

नागपूर : सत्र न्यायालयाने शाळकरी मुलीला लैंगिक स्पर्श करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
अरविंद उत्तम वानखेडे (४७) असे आरोपीचे नाव असून तो द्रोणाचार्यनगर, डोरले ले-आऊट येथील रहिवासी आहे. त्याला पोक्सो (लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण) कायद्याच्या कलम ८ अंतर्गत दोषी ठरवून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२)(एफ) व पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला नाही. त्याच्याविरुद्ध या तिन्ही कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
आरोपी व्यवसायाने आॅटोचालक असून, पीडित मुलगी त्याच्या आॅटोतून रोज शाळेत जाणे-येणे करीत होती. २ मार्च २०१६ रोजी मुलगी आॅटोत एकटीच असताना आरोपीने तिच्यासोबत लैंगिक कृत्य केले. ही घटना अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत घडली होती. मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ४ मार्च रोजी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अर्चना वाघमारे यांनी प्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयात शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता आर. आर. मेंढे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Three years imprisonment for a sexually touching person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.