In three weeks, petrol is priced at Rs 1.78, diesel at 2.85 rupees cheap | तीन आठवड्यात पेट्रोल १.७८ रुपये, डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त
तीन आठवड्यात पेट्रोल १.७८ रुपये, डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. देशातील मेट्रो शहरांसह नागपूर शहरात तीन आठवड्यात पेट्रोल प्रति लिटर १.७८ रुपये आणि डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, तर वाहतूकदारांनीही समाधान व्यक्त केले आहे.
२८ मे रोजी प्रति लिटर ७७.९४ रुपयांवर असलेले पेट्रोलचे दर १५ जूनला ७६.१६ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. २८ मेपासून पेट्रोलच्या दरात निरंतर घसरण सुरू आहे. ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरीही पंपचालकांची ओरड सुरू आहे. एक दिवसापूर्वीचा शिल्लक साठा दुसऱ्या दिवशी कमी दरात विकावा लागत आहे. १४ जूनच्या तुलनेत शनिवार, १५ जूनचे दर ७६.१६ रुपयांवर आले आहेत. एका दिवसात ३५ पैशांची कपात झाल्यामुळे १५ जूनला काही हजारांचा तोटा सहन करून विक्री करावी लागणार असल्याचे पंपचालकांचे मत आहे. अशीच स्थिती डिझेलमध्ये आहे. २८ मे रोजी डिझेलचे दर ७०.४० रुपयांवर होते. तीन आठवड्यात घसरण होऊन १५ जूनला ६७.५५ रुपयांपर्यंत खाली आले. १४ जूनच्या तुलनेत एकाच दिवसात डिझेल ४२ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढेही कमी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

पेट्रोल दराचा तुलनात्मक तक्ता
तारीख दर (रुपये)
२८ मे ७७.९४
३० मे ७७.८८
३१ मे ७७.८१
३ जून ७७.४५
६ जून ७७.२३
७ जून ७७.१०
९ जून ७६.७२
१० जून ७६.५९
१३ जून ७६.५१
१५ जून ७६.१६


Web Title: In three weeks, petrol is priced at Rs 1.78, diesel at 2.85 rupees cheap
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.