तीन रेल्वेगाड्या रद्द, २४ गाड्यांना विलंब

By Admin | Updated: January 8, 2017 02:06 IST2017-01-08T02:06:21+5:302017-01-08T02:06:21+5:30

दक्षिण मध्य रेल्वेंतर्गत काजीपेठ आणि बल्लारशा दरम्यान मालगाडीच्या वॅगन रुळावरून घसरल्यामुळे

Three trains canceled, 24 trains delayed | तीन रेल्वेगाड्या रद्द, २४ गाड्यांना विलंब

तीन रेल्वेगाड्या रद्द, २४ गाड्यांना विलंब

रेल्वे वेळापत्रक विस्कळीतच : रेल्वेस्थानकावर वाढली प्रवाशांची गर्दी

नागपूर : दक्षिण मध्य रेल्वेंतर्गत काजीपेठ आणि बल्लारशा दरम्यान मालगाडीच्या वॅगन रुळावरून घसरल्यामुळे रेल्वेगाडी क्रमांक १२६१५ चेन्नई-दिल्ली जीटी एक्स्प्रेस, १२६२१ चेन्नई-दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस आणि १२७७२ नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर २४ रेल्वेगाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्यामुळे त्या विलंबाने धावत आहेत.

मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे दक्षिण आणि उत्तरेकडील भागातून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्यामुळे या गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत आहेत. दरम्यान विलंबाने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२७०६ सिकंदराबाद-गुंटुर एक्स्प्रेस १६ तास, १२७२७ विशाखापट्टणम-हैदराबाद गोदावरी एक्स्प्रेस ३० तास, १८०३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ४.१५ तास, १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्स्प्रेस ८ तास, १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस १५ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगाणा एक्स्प्रेस २.१५ तास, १२५७० आनंद विहार-जयनगर गरीबरथ एक्स्प्रेस १.३० तास, १२५२२ एर्नाकुलम-बरौनी राप्तीसागर एक्स्प्रेस १.१५ तास, १२२९६ पाटलीपुत्र-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ७.३० तास, २२३५१ पाटलीपुत्र-यशवंतपूर एक्स्प्रेस ३.३० तास, १२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस २ तास या गाड्यांसह २४ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आधीच दिल्लीकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या दाट धुके पडल्यामुळे उशिराने धावत आहेत.

यात मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्याही मार्गात बदल केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय आणखीनच वाढली आहे.

सलग २४ तासापासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊन रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. शनिवारीही दिवसभर प्रवासी उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्याची चौकशी करताना दिसले. (प्रतिनिधी)

Web Title: Three trains canceled, 24 trains delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.