हरभरा चोरीप्रकरणी तीन चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:12 IST2021-08-28T04:12:34+5:302021-08-28T04:12:34+5:30
भिवापूर : ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली असलेल्या शासकीय गोदामातून १० क्विंटल हरभरा चोरी करणाऱ्या आरोपींच्या भिवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४ ...

हरभरा चोरीप्रकरणी तीन चोरट्यांना अटक
भिवापूर : ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली असलेल्या शासकीय गोदामातून १० क्विंटल हरभरा चोरी करणाऱ्या आरोपींच्या भिवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४ क्विंटल हरभरा जप्त करण्यात आला.
अजय श्रीराम नान्हे (२१), सुनील गोपीचंद तागडे (३०), पंचशील नसील वानखेडे (३०) सर्व रा. कारगाव, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, कारगाव येथे बसस्थानकाच्या मागे शासकीय गोडाऊन असून देखरेखीची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. दरम्यान, गत २४ व २५ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी गोडाऊनच्या मागच्या खिडकीच्या लोखंडी सळाकी तोडून आत प्रवेश करीत तब्बल १० क्विंटल हरभरा चोरून नेला होता. याप्रकरणी सरपंच माधुरी दडवे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी गुन्हा नोंदवीत पोलिसांनी तपासचक्र फिरविले. शुक्रवारी तिन्ही चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४ क्विंटल हरभरा जप्त करण्यात आला असून, उर्वरित मालाचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात राजेंद्र डहाके, अनिल कोकोडे करीत आहेत.