’एनएडीटी’तील तीन विद्यार्थी नागरी सेवेत

By Admin | Updated: June 2, 2017 02:36 IST2017-06-02T02:36:45+5:302017-06-02T02:36:45+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या ३४ विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली होती.

Three students of 'NADT' in civil service | ’एनएडीटी’तील तीन विद्यार्थी नागरी सेवेत

’एनएडीटी’तील तीन विद्यार्थी नागरी सेवेत

आतापर्यंत ९५ विद्यार्थ्यांची निवड : प्रत्येकी दहा आयएएस व आयपीएस व दोन आयएफएस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या ३४ विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली होती. त्यापैकी ७ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
जुने मॉरिस कॉलेज परिसरात असलेल्या सुसज्ज प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधासह योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी बसणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली.
लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेसाठी या संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून यामध्ये दक्षदिग पाल नंदेश्वर, शरयू एच. आदे व निखिल बोरकर हे विद्यार्थी यशस्वी ठरले आहे. या संस्थेची स्थापना झाल्यापासून ९५ विद्यार्थी नागरी सेवा परीक्षेसाठी पात्र ठरले असून यामध्ये दहा आयएएस, दहा आयपीएस, दोन आयएफएस, तसेच ७३ अनुषंगिक सेवा विभागासाठी त्यांची निवड झाली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून यासाठी प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होते. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरायचे असून ६६६.स्र१ी्रं२ल्लँस्र४१.ङ्म१ॅ.्रल्ल या वेबसाईटवर प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. आॅक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या निवड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शंभर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या परीक्षेला कुठल्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी पात्र आहे. १ जानेवारीपासून नियमित अभ्यासक्रमाला सुरुवात होते. दहा विद्यार्थ्यांची बार्टीतर्फे तर दहा विद्यार्थ्यांची अल्पसंख्याक या घटकातून निवड करण्यात येत असून विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये भत्ता देण्यात येत असल्याची माहिती यावेळी या संस्थेचे अधीक्षक संजय जगताप यांनी दिली.
प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणासाठी सुसज्ज लायब्ररी अभ्यासिका, निवास व्यवस्था असून विद्यार्थ्यांना भारतीय प्रत्यक्ष कर अकादमीतर्फे नियमित मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेमधून नागरी सेवा परीक्षा निवडीसाठी प्राधान्य देण्यात येत असून येथील विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्तीर्ण होत आहे. या संस्थेचे विद्यार्थी महाराष्ट्रातील शासनाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत.

Web Title: Three students of 'NADT' in civil service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.