तिघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:22+5:302021-06-16T04:10:22+5:30

छोटी तरोडीच्या सालासार कंपनीत राहणारा धीरजसिंग रामप्रकाशसिंग केवट (वय ३५) याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी ३ च्या ...

The three strangled him | तिघांनी लावला गळफास

तिघांनी लावला गळफास

छोटी तरोडीच्या सालासार कंपनीत राहणारा धीरजसिंग रामप्रकाशसिंग केवट (वय ३५) याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पिंकी धीरजसिंग केवट (वय २८)यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

यशोधरानगरातील कुंदनलाल गुप्तानगरात राहणारा शुभम योगराज भानारकर (वय २५) याने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सुमन योगराज भानारकर (वय ५०) यांनी दिलेल्या माहितीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

अशाच प्रकारे पाचपावलीतील तांडापेठ भागात राहणारे नारायण नत्थूजी पाटील (वय ४१)यांनी गळफास लावून आत्महत्या केली. अर्चना नारायण पाटील (वय ३४) यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: The three strangled him