प्रेयसीसह तिघांची गोळी घालून हत्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:12+5:302021-07-11T04:07:12+5:30

अनिलसिंह ठाकूर बैतूल : एका युवकाने प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यासह तिघांची गोळी घालून हत्या केली. नंतर स्वत:लाही गोळी घालून ...

Three shot dead along with girlfriend () | प्रेयसीसह तिघांची गोळी घालून हत्या ()

प्रेयसीसह तिघांची गोळी घालून हत्या ()

अनिलसिंह ठाकूर

बैतूल : एका युवकाने प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यासह तिघांची गोळी घालून हत्या केली. नंतर स्वत:लाही गोळी घालून संपविले. बैतुल (मध्य प्रदेश) येथील आमला पोलीस ठाणे हद्दीत प्रेम प्रकरणातून शनिवारी हे हत्याकांड घडले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. भानू ठाकूर (२६) रा. बोडखी, आमला असे आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सिमाला प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, भानू ठाकूर हा ट्रक ड्रायव्हर होता. त्याची बरखा सोनी (२२) हिच्याशी सहा वर्षांपासून मैत्री होती. तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता, परंतु काही कारणास्तव त्यांचे लग्न होत नव्हते. त्यामुळे भानू मानसिक तणावात होता. आराेपी भानू याने दुपारी भवानीनगर येथील घरी जाऊन बरखा सोनीला गोळी घालून ठार केले. यादरम्यान तिला वाचवण्यासाठी आलेला बरखाच्या मामाचा मुलगा बंटी सोनी (२२) यालाही गोळी घातली. गोळीचा आवाज ऐकून शेजारी राहणारा लक्की पाल (१८) हा धावत खोलीत आला. भानूने त्यालाही गोळी घातली. यात दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वत:ही गोळी घालून आत्महत्या केली.

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, बरखाची हत्या करण्याची योजना आरोपीने आधीच आखली होती. त्यानुसार तो सकाळीच तिच्या घरी गेला होता. हत्या केल्यानंतर आरोपीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. यात त्याने हत्या करण्याचे कारण सांगत यासाठी स्वत:ला जबाबदार ठरविले आहे. या व्हिडिओत त्याने बोडखी आमला येथील राकेश हारोडे (२८)याच्याकडून पिस्टल ( बंदूक) खरेदी केल्याचेही सांगितले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्टलही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी सायंकाळी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Three shot dead along with girlfriend ()