एकाच रात्री तीन दुकाने फाेडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:53+5:302021-07-11T04:07:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : अज्ञात चाेरट्यांनी शहरातील मेडिकल स्टोर्ससह तीन दुकाने फाेडली. त्यात चाेरट्यांनी राेख २० हजार रुपयांसह ...

एकाच रात्री तीन दुकाने फाेडली
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : अज्ञात चाेरट्यांनी शहरातील मेडिकल स्टोर्ससह तीन दुकाने फाेडली. त्यात चाेरट्यांनी राेख २० हजार रुपयांसह डीव्हीआर व सीपीयू असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि.९) मध्यरात्री घडली असून, शनिवारी सकाळी उघडकीस आली.
शहरातील रामटेक मार्गावरील शंकर दिवाळू सुपारे (४७) यांच्या मालकीचे सुपारे मेडिकल स्टाेर्स नावाने औषधाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ९.३० वाजता नेहमीप्रमाणे औषध दुकान बंद करून ते वरच्या माळ्यावरील घरी गेले हाेते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चाेरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्यांनी दुकानातील गल्ल्यात ठेवलेले राेख २० हजार रुपये, तीन हजार रुपये किमतीचे डीव्हीआर व सीपीयू किंमत तीन हजार रुपये असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पाेबारा केला. त्यानंतर चाेरट्यांनी काही अंतरावरील अमित हाडगे यांच्या मालकीच्या साई विभूती ज्वेलर्स तसेच माऊली जनरल स्टाेर्स दुकानाचे शटर वाकवून चाेरीचा प्रयत्न केला. मात्र त्यात चाेरट्यांना काहीही हाती लागले नाही. दरम्यान शनिवारी सुपारे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना शटरचे कुलूप तुटलेले आढळून आले. औषध दुकानात चाेरी झाल्याचे दिसून येताच त्यांनी माैदा ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पाेलीस हवालदार मनाेहर जंगवाड करीत आहेत.
...
बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करा
शहरातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. परंतु गेल्या ८-९ महिन्यापासून ते बंद अवस्थेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे पाेलिसांच्या नियंत्रणाखाली असल्याने कुठे काय सुरू आहे, हे सहज समजते. असे असताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.