शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पीजीच्या वाढल्या तीन जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 23:07 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) तीन जागा वाढल्या.

ठळक मुद्देगॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीची एक तर कार्डिओलॉजीची दोन जागा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) तीन जागा वाढल्या. यात ‘डॉक्टरेट ऑफ मेडिसीन’ (डी.एम.) गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एक तर ‘डीएम’ कार्डीओलॉजी विभागाच्या दोन जागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २०१३ नंतर या दोन्ही विभागाच्या जागा वाढल्या.मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या नवीन निकषानुसार प्राध्यापकाला दोन, सहयोगी प्राध्यापकाला दोन तर सहायक प्राध्यापकाला दोन जागेला मंजुरी दिली. त्यानुसार ‘एमसीआय’ने वाढीव पीजीच्या जागांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागपूर मेडिकलने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभागाच्या वाढीव एक, कार्डिओलॉजी विभागाच्या वाढीव दोन जागांचा प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान ‘एमसीआय’चमूने पायाभूत सोयींचा पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता हे प्राध्यापक असल्याने त्यांच्या नावाने आणखी एक ‘पीजी’ची जागा मिळाली. आता या विभागात एकूण दोन जागा झाल्या आहेत. कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे यांना ‘पीजी’च्या दोन जागा मिळाल्या होत्या. सहयोगी प्राध्यापक असलेली डॉ. पी.पी. देशमुख यांच्या नावाने आता दोन जागा मिळाल्याने आता या विभागात एकूण चार जागा झाल्या आहेत. डॉ. देशपांडे व डॉ. गुप्ता यांना २०१३ मध्ये पहिल्यांदा ‘पीजी’ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी वाढीव जागा मिळाल्या आहेत.कार्डिओलॉजीमध्ये आणखी एक कॅथलॅब उभारणारमेडिकलशी संलग्न असलेल्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात ‘पीजी’ची एक तर कार्डिओलॉजी विभागत ‘पीजी’च्या दोन जागांची भर पडली आहे. याची दखल घेत विशेषत: कार्डिओलॉजी विभागात काही महिन्यांपूर्वीच एक नव्या कॅथलॅबचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या अर्थसंकल्पात याला प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच रुग्णांना होणार आहे.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय