शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार ‘सिक लिव्ह’, नागपुरातील तीन पोलीस उपनिरीक्षक निलंबित; असा उघड झाला संपूर्ण प्रकार

By योगेश पांडे | Updated: April 25, 2025 01:12 IST

विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी बुधवारी पोलीस ठाण्याला अचानक भेट देत पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता...

नागपूर : कुठलीही वैद्यकीय कागदपत्रे सादर न करता वारंवार ‘सिक लिव्ह’ घेणे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तीन उपनिरीक्षकांना चांगलेच भोवले आहे. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशांवरून तीनही उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी बुधवारी पोलीस ठाण्याला अचानक भेट देत पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता.निशा गवळी, महेश पवार व वैशाली सोळंके अशी कारवाई झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील कारभाराची चाचपणी केली. तसेच तक्रारदारांशीदेखील संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीबाबतदेखील पाहणी केली. काही अधिकारी ‘सिक लिव्ह’ घेऊन कामावर गैरहजर असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. पोलीस आयुक्तांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तीनही उपनिरीक्षकांनी ‘सिक लिव्ह’वर जाताना कुठलीही वैद्यकीय कागदपत्रे सादर केली नव्हती. अधिकारी कर्तव्य टाळण्याच्या उद्देशाने जाणुनबुजून ‘सिक लिव्ह’ घेत असल्याची बाबदेखील यातून समोर आली.एकीकडे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असताना काही अधिकारी असे वागत असतील तर ते अयोग्य आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी त्यांचे तातडीने निलंबन करण्याचे आदेश जारी केले. भविष्यात अशा प्रकारचा हलगर्जीखपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक अधिकारी व अंमलदारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, अन्यथा कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Policeपोलिसsuspensionनिलंबन