तीन पोलीस शिपाई निलंबित

By Admin | Updated: March 16, 2017 02:08 IST2017-03-16T02:08:53+5:302017-03-16T02:08:53+5:30

१४ लाखांच्या जुन्या नोटा हडप करणारे नागपूर ग्रामीण मधील तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले.

Three police constables suspended | तीन पोलीस शिपाई निलंबित

तीन पोलीस शिपाई निलंबित

अपहरण व लुटमारीचा गुन्हा दाखल :
१४ लाखांच्या लुटमारीचे प्रकरण
नागपूर/खापरखेडा : १४ लाखांच्या जुन्या नोटा हडप करणारे नागपूर ग्रामीण मधील तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून, ते नागपूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्यावर शनिवारी अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता.
८ मार्चला या तिघांनी खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारिक शेख (नागपूर) आणि राजू तिरपुडे (खापरखेडा) तसेच विशाल नामक तरुण बसून असलेली कार रोखली होती. कारची झडती घेतली तेव्हा त्यात (चलनातून बाद झालेल्या) ५०० आणि १००० रुपयाच्या २८ लाखांच्या जुन्या नोटा आढळल्या होत्या. त्या नोटा जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी या पोलिसांनी शारिक, राजू तसेच विशालला धाकदपट करून भेंडाळा गावाजवळ नेले. त्यानंतर त्यातील १४ लाख रुपये या तिघांनी काढून घेतले, अन्य कोणतीही कारवाई न करता तिघांना सोडून दिले. या प्रकरणाची तक्रार शारिकने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्याकडे शनिवारी दुपारी केली. पुरंदरे यांनी लगेच पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांना माहिती दिली.
प्रकरणाचा तपास सुरू होताच शेंडे, डांगे आणि नागरेने हे प्रकरण दडपण्यासाठी विशाल वानोडे आणि अण्णा नामक दलालांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती. लोकमतने हे प्रकरण रविवारी प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली.
त्यानंतर रविवारला रात्री उशिरा शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे या तिघांवर कलम ३६३ (अपहरण) आणि ३९२ (लुटमार) अन्वये सावनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह विशाल वानोडे आणि अण्णा नामक दलालाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे. वानोडे यानेच या घटनेची पोलिसांना टीप दिली होती आणि त्यानेच नंतर दोन लाखांचे आमिष दाखवून प्रकरणात खोटी माहिती देऊन या तिघांच्या बचावाचा प्रयत्न केला होता, असे तपासात उघड झाले, त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली.दरम्यान लोकमतने हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर बुधवारी या तिघांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Three police constables suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.