पाटणसावंगी येथे भरदिवसा तीन ठिकाणी चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:47+5:302020-12-30T04:13:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पाटणसावंगी : चाेरट्यांनी भरदिवसा तीन ठिकाणी घरफाेडी करीत साेन्याचे दागिने व गृहाेपयाेगी वस्तू असा एकूण ३ ...

पाटणसावंगी येथे भरदिवसा तीन ठिकाणी चाेरी
लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : चाेरट्यांनी भरदिवसा तीन ठिकाणी घरफाेडी करीत साेन्याचे दागिने व गृहाेपयाेगी वस्तू असा एकूण ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे रविवारी (दि. २७) दुपारी घडली.
दिलीप हरिहर कामडी, रा. वाॅर्ड क्रमांक-५, पाटणसावंगी, ता. सावनेर हे कुटुंबीयांसह रविवारी बाहेरगावी नातेवाईकांकडे गेले हाेते. ते सायंकाळी घरी परतले असता, त्यांना दाराचे कुलूप तुटलेले तसेच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे दिसले. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांना कळविले. यात चाेरट्याने परिसरात कुणीही नसताना दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण ३ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले.
याच काळात चाेरट्यांनी सुखदेव शेंडे, रा. वाॅर्ड क्रमांक-२, पाटणसावंगी यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या घरातून १० हजार रुपये राेख चाेरून नेले. घटनेच्या वेळी सुखदेव शेंडे व कुटुंबीय बाहेर गेले हाेते. त्याच्याही घराला कुलूप हाेते. एवढेच नव्हे तर चाेरट्याने मनीष काेहळे, रा. वाॅर्ड क्रमांक-३, पाटणसावंगी यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या घरातून ५० हजार रुपये किमतीचा टीव्ही चाेरून नेला. या तिन्ही प्रकरणामध्ये सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर करीत आहेत. या तिन्ही घटना एकाच दिवशी व दिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेत आहे.