अभियंत्यासह तिघांना चिरडले

By Admin | Updated: December 3, 2015 03:20 IST2015-12-03T03:20:59+5:302015-12-03T03:20:59+5:30

अनियंत्रित ट्रक आणि टिप्परने तीन तासात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्यासह तिघांचे बळी घेतले.

Three people were crushed with the engineer | अभियंत्यासह तिघांना चिरडले

अभियंत्यासह तिघांना चिरडले

हुडकेश्वर-खरबीमध्ये अपघात : पत्नीचा मृत्यू, पती गंभीर
नागपूर : अनियंत्रित ट्रक आणि टिप्परने तीन तासात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्यासह तिघांचे बळी घेतले. या घटना हुडकेश्वर आणि नंदनवन येथे घडल्या.
पहिली घटना बुधवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास हुडकेश्वर येथे घडली. महेंद्र हरिचंद्र बारसागडे (४०) रा. वृंदावन अपार्टमेंट हुडकेश्वर असे मृताचे नाव आहे. मृत बारसागडे हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. ते गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे कार्यरत होते. प्रकृती बिघडल्याने ते तीन दिवसांपूर्वीच नागपुरात आले होते. प्रकृतीत सुधार झाल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी ड्युटीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना सकाळी ६.३० वाजता रवाना व्हायचे होते. परंतु वेळेवर झोप न उघडल्याने त्यांना उशीर झाला. त्यामुळे ते ड्युटीवर जाऊ न शकल्याने घरीच थांबले. ते पत्नी अंजलीला चौकातून जाऊन येतो असे सांगून घरून निघाले. सकाळी ९.४५ वाजता चौकातून खर्रा खाऊन परत येत असताना संजय गांधी खदान चौकातून ते डाव्या बाजूला वळत असताना म्हाळगीनगर चौकाकडून उदयनगर चौकाकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच/४०/वाय/८५३० ) त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघातामुळे संतापलेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. पोलीस ठाणे जवळच असल्याने पोलिसही लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृताच्या कार्यालयात सूचना दिली. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती मिळाली. त्यांच्या कुटुंबीयात पत्नी आणि ७ वर्षांची मुलगी श्रावणी आहे. त्यांचे आई-वडील चंद्रपूरला राहतात. लहान भाऊ करमचंद खासगी कंपनीत काम करतो. दुसरी घटना दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील खरबी चौकात घडली. आॅटोचालक राकेश माहुर्ले सवारी बसवून खरबी चौकातून जात होता. त्याच्या आॅटोमध्ये रामजी शुक्ला (६०) व त्यांची पत्नी सूर्जकली (५५) रा. जय जलारामनगर खरबी, शैला सुखदेव भांगे (४५), नारायण रहांगडाले (७०) आणि एक इतर वृद्ध महिला होती. राकेश नारायण कॉलनीतून आॅटो घेऊन मुख्य रस्त्यावर आला.

Web Title: Three people were crushed with the engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.