शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नागपूर महापालिकेत २० वर्षांनंतर पुन्हा तीनसदस्यीय प्रभाग; विकासकामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 10:13 PM

Nagpur News तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा २०२२ मध्ये होऊ घातलेली नागपूर महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा २०२२ मध्ये होऊ घातलेली नागपूर महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल. २००२ मध्ये तीनसदस्यीय प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली होती. पण, नागरिकांना विकासकामांबाबत आलेले अनुभव चांगले नव्हते. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीतही नागपूरकरांनी असेच अनुभव घेतले. नगरसेवक एकमेकांवर विषय ढकलतात. जबाबदारी निश्चित होत नाही. एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीमुळे या कटकटीतून नागरिकांची सुटका होईल, अशी आशा होती. मात्र, राज्य सरकारने तीनसदस्यीय प्रभाग केल्याने याचा विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Three-member ward again after 20 years; Hit the development work) (nagpur municipal corporation)

२००२ मध्ये नागपुरात तीनसदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत उमेदवार व मतदारांसाठीही नवी होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील सत्तेचा फायदा झाला. काँग्रेसला सर्वाधिक ५१ जागा मिळाल्या. भाजपला ४७, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, शिवसेना ६, बसपा ९ तर १२ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. मनपात काँग्रेस-राष्ट्रवादी व बसपाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. तीनसदस्यीय पद्धतीमुळे नागरिकांची निराशा झाली. २००७ मध्ये एकसदस्यीय वॉर्ड होताच काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. भाजपने बाजी मारून सत्ता काबीज केली. त्यानंतर २०१२ मध्ये दोनसदस्यीय प्रभाग, तर २०१७ सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आली. २००७ पासून मनपात भाजपची सत्ता कायम आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना २०१७ मध्ये चारसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय बदलून तीनसदस्यीय प्रभागाची घोषणा करण्यात आली. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित राहत नाही. लहानसहान कामांसाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. यामुळे या निर्णयावर सामान्य नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

वॉर्डाची पुनर्रचना करावी लागणार

- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीची पुनर्रचना करण्याला सुरुवात केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होणार असल्याने प्रशासनाला पुन्हा त्यानुसार प्रभागरचना करावी लागणार आहे.

 

अशी बदलली प्रभागरचना

वर्ष - प्रभागपद्धती

२००२- तीनसदस्यीय प्रभाग

२००७- एकसदस्यीय वॉर्ड

२०१२ - दोनसदस्यीय प्रभाग

२०१७ - चारसदस्यीय प्रभाग

२०१९ - हिवाळी अधिवेशनात एकसदस्यीय प्रभाग जाहीर

२०२१ - तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

 

तीन निवडणुकांत १५ जागा वाढल्या

लोकसंख्यावाढीसोबतच नगरसेवकांची संख्या वाढल्याने वाॅर्डांची रचना वेळोवेळी बदलण्यात आली. २००७ मध्ये महापालिकेत १३६ नगरसेवक होते. २०१२ मध्ये १४५ होते. तर २०१७ च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १५१ झाली. २०२२ च्या निवडणुकीत पुन्हा नगरसेवकांची संख्या १५ ने वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मनपात १६६ नगरसेवक राहतील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका