भीषण अपघातात तीन ठार
By Admin | Updated: April 24, 2016 02:57 IST2016-04-24T02:57:48+5:302016-04-24T02:57:48+5:30
आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्यांच्या इनोव्हा कारला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली.

भीषण अपघातात तीन ठार
भरधाव टिप्परने घेतले बळी : लहानग्यांसह आठ जण गंभीर जखमी
नागपूर : आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्यांच्या इनोव्हा कारला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. त्यामुळे कारमधील तीन महिलांचा मृत्यू झाला तर तीन मुलांसह आठ जण गंभीर जखमी आहेत. शनिवारी रात्री आऊटर रिंग रोडवर पारडीजवळ हा भीषण अपघात घडला. त्यामुळे घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धरमतरी (छत्तीसगड) येथील प्रतिष्ठित लोढा परिवारातील सदस्य आपल्या नागपुरातील नातेवाईकांकडे आले होते. लग्नाच्या वाढदिवसाचा समारंभ छत्तरपूर फार्म हाऊसमध्ये असल्याने लोढा कुटुंबीय आपल्या इनोव्हा कारने जात होते. रात्री ९. ४५ च्या सुमारास पारडीजवळ मागून आलेल्या भरधाव टिप्परच्या चालकाने कारला जोरदार धडक दिली.