नागपूरात एकाचवेळी तीन मैत्रीणी बेपत्ता

By Admin | Updated: June 24, 2017 16:45 IST2017-06-24T16:45:02+5:302017-06-24T16:45:02+5:30

एकाच वस्तीत राहणा-या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनेगावात खळबळ उडाली.

Three girlfriends missing at Nagpur | नागपूरात एकाचवेळी तीन मैत्रीणी बेपत्ता

नागपूरात एकाचवेळी तीन मैत्रीणी बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर, दि. 24 -  एकाच वस्तीत राहणा-या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनेगावात खळबळ उडाली. बेपत्ता असलेल्या तीन मुलींपैकी दोन आठवीच्या विद्यार्थीनी (वय १३) आणि एक दहावीची विद्यार्थीनी (वय १५) आहे. 
 
आजुबाजुला राहणा-या या तिघीं मैत्रीणी आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता त्या घरून निघून गेल्या. नेहमीप्रमाणे बाहेर गेल्या असाव्या असे समजून पालकांनी फारसे लक्ष दिले नाही. सायंकाळ झाली तरी त्या परत आल्या नाही. त्यामुळे आजुबाजुला विचारपूस सुरू झाली. एकीने रागाच्या भरात आम्ही निघून जात आहो, असे सांगितल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली. 
 
नातेवाईक, मैत्रीणींकडे शोध घेऊनही त्यांचा पत्ता न लागल्याने पालकांनी सोनेगाव ठाण्यात सायंकाळी तक्रार नोंदवण्यात आली. एकाचवेळी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पोलिसांनीही लगेच शोधाशोध सुरू केली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सोनेगावचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली.
 

Web Title: Three girlfriends missing at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.