शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या तोंडावर तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 31, 2014 00:57 IST

वरोरा तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी गळफास लावून तर अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील हरदोली येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

दोन दिवसांत तीन घटना : मागील महिन्यात झाला होता मुलींचा विवाहवरोरा (जि. चंद्रपूर)/धारणी (जि. अमरावती) : वरोरा तालुक्यातील  दोन शेतकर्‍यांनी गळफास  लावून तर अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील हरदोली येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन  करून आत्महत्या केली. रबी हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने शेतकर्‍यांची  स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. जामणी येथील अंनत बळीराम जेऊरकर (४५) तसेच ताडगव्हाण येथील विजय अण्णाजी  बदखल (४५) असे मृत शेतकर्‍यांचे नाव आहे. अनंत जेऊरकर या शेतकर्‍याच्या आईच्या  नावावर शेती आहे. या शेतीमध्ये कुटुंबीयाचे भागत नसल्याने अनंत दुसर्‍या शेतकर्‍याकडे चाखरी  करीत होता. त्याला शासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले.  घरकुलाचे अर्धे बांधकाम झाले  आहे. मात्र अनुदान मिळाले नसल्याने पुढील बांधकाम कसे करावे, या विवंचनेत तो होता.  त्याच्यावर खासगी कर्जही होते. यातच त्याने बुधवारी शेतातील झाडाला गळफास लावून  आत्महत्या केली.  दुसर्‍या घटनेत ताडगव्हाण येथे घडली. विजय अण्णाजी बदखल (४५) या  शेतकर्‍याकडे पाच एकर शेती आहे. मागील महिन्यातच दोन मुलींचा विवाह केला. यावेळी  राष्ट्रीयकृत बँकेकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मागील काही वर्षांंपासून अतवृष्टी व  सततची नापिकी यामुळे विवंचनेत होता. यात गुरुवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन  आत्महत्या केली. या शेतकर्‍याने मागील महिन्यातच आपल्या दोन मुलींचा विवाह केला, हे विशेष.धारणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकेच्या अडीच लाखाच्या पीक कर्जाची परतफेड करणे  अशक्य झाल्याने हरदोली येथील शेतकरी रामनिवास गेंदालाल जैस्वाल (४0) यांनी विषारी  औषध प्राशन करुन आत्महत्या केली.  गतवर्षी संततधार पावसामुळे पिके नष्ट झाली. त्यामुळे  कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न जैस्वाल यांना पडला होता. वैफल्यग्रस्त स्थितीत विषारी  औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले  होते. परंतु उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. (तालुका प्रतिनिधी)