एका नावाचे तीन ‘डेथ सर्टिफिकेट’

By Admin | Updated: July 21, 2015 03:13 IST2015-07-21T03:13:47+5:302015-07-21T03:13:47+5:30

मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातर्फे माझ्या पतीच्या नावावर वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन नंबरने तीनवेळा ‘डेथ सर्टिफिकेट’

Three 'Death Certificate' by one name | एका नावाचे तीन ‘डेथ सर्टिफिकेट’

एका नावाचे तीन ‘डेथ सर्टिफिकेट’

नगरसेविका पाटणकर यांचा सभागृहात खुलासा : जीवाला धोका असल्याचीही व्यक्त केली शंका
नागपूर : मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातर्फे माझ्या पतीच्या नावावर वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन नंबरने तीनवेळा ‘डेथ सर्टिफिकेट’ जारी करण्यात आले आहे, असा आरोप बसपाच्या नगरसेविका किरण पाटणकर (रोडगे) यांनी सोमवारी मनपाच्या आमसभेत केला.
या संबंधातील पुरावेही त्यानी सभागृहात सादर केले. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने पतीच्या नावाने तीनवेळा वेगवेगळ्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र दिले. या आधारे अर्ज केला नसतानाही परस्पर दुसऱ्याच्या नावाने मालमत्ता करण्यात आली. या बोगस नामांतराच्या आधारे लाखो रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मागील पंधरा वर्षांपासून मनपा कार्यालयात या संदर्भात तक्रारी करीत आहे. परंतु न्याय मिळाला नाही. वेळीच न्याय मिळाला असता तर माझ्या पतीच्या नावावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-आॅपरेटिव्ह बँकेतून लाखो रुपयांचे बोगस कर्ज उचलण्यात आले नसते, असेही त्यांनी सांगितले.
पाटणकर म्हणाल्या, माझ्या पतीला दरिया रोडगे नावाने लोक ओळखत होते. परंतु त्यांचे नाव प्रेमकुमार माणिकराव रोडगे होेते. याच नावाने ते बँक वा शासकीय व्यवहार करीत होते. शिक्षणही त्यांनी याच नावावर घेतले आहे. २८ नोव्हेंबर २००१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी नामांतरणासाठी अर्ज केला नव्हता. असे असतानाही १८ आॅगस्ट २००१ ला किरण रोडगे नावाने नामांतर करण्यात आले. नामांतरण करण्यात आले त्यावेळी माझे पती गंभीर आजारी होते. मी माझे नाव किरण पाटणकर (रोडगे)असेच लिहिते.

मृत्यू प्रमाणपत्रात वारंवार फेरबदल
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमाणपत्राच्या आधारे १२ डिसेंबर २००१ रोजी मनपाने मृत्यू प्रमाणपत्र दिले. यात दरिया माणिकराव रोडगे असे नाव लिहिले होते व जात महार दर्शविण्यात आली होती. ६ आॅगस्ट २००२ ला याच नावाने मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात मात्र जात हिंदू दर्शविण्यात आली आहे. पाटणकर यांनी घाटावरील नोंदीनुसार ६ आॅगस्ट २०११ शपथपत्र तयार करून दरिया रोडगे यांच्या जागी प्रेमकुमार ऊर्फ दरिया माणिकराव रोडगे असे प्रमाणपत्र घेतले. त्यानंतरही दरिया माणिकराव रोडगे नावाने मनपाने मृत्यूप्रमाणपत्र दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

Web Title: Three 'Death Certificate' by one name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.