शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास दिवसांत तीन कोटींची तिकीट विक्री, क्यूआर कोडचा पर्याय, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 08:59 IST

रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरसमोर लांबच लांब गर्दीत उभे राहून तिकीट काढण्यास आतापर्यंत पर्याय नसल्याने प्रवासी रांगेत ताटकळत उभे राहत होते.

नागपूर : रेल्वेच्या तिकीट काउंटरसमोर गर्दीत उभे राहून तिकीट खरेदीचा व्यवहार करण्याऐवजी रेल्वे प्रवासी क्यूआर कोडच्या माध्यमातून झटपट तिकीट विक्रीचा व्यवहार करण्याला प्राधान्य देत आहेत. गेल्या ५० दिवसांत क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांनी तीन कोटी रुपयांच्या तिकिटांची खरेदी केली आहे. 

रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरसमोर लांबच लांब गर्दीत उभे राहून तिकीट काढण्यास आतापर्यंत पर्याय नसल्याने प्रवासी रांगेत ताटकळत उभे राहत होते. परंतु काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी क्यूआर कोडचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्याला रेल्वे प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गर्दीत आणि रांगेत उभे राहून तिकीट घेण्याऐवजी ग्राहक आता झटपट कोड स्कॅन करून पाहिजे त्या ठिकाणचे रेल्वे तिकीट विकत घेत आहेत. 

प्रवाशांचा सहभाग...रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत नागपूर विभागात एक लाख, ५४ हजार प्रवाशांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट विकत घेतले.त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत एक कोटी, २३ लाख, ५५ हजार ९३६ रुपये जमा झाले. दुसरीकडे २६,४८९ प्रवाशांनी १ कोटी, ४९ लाख, ५८ हजार रुपयांचे विविध श्रेणीचे आरक्षित तिकीट खरेदी केले.

प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही सोयीचे- ऑनलाइन तिकीट खरेदी-विक्रीचा व्यवहार रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी या दोघांसाठीही सोयीचा आहे. कारण प्रवाशांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही. तसेच कर्मचाऱ्यांना सुट्या पैशांसाठी प्रवाशांसोबत वाद घालण्याची वेळ येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइनचा व्यवहार झटपट पार पडतो. त्यामुळे तो दोघांसाठीही सोयीचा ठरतो.

टॅग्स :railwayरेल्वे