गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST2021-02-18T04:10:58+5:302021-02-18T04:10:58+5:30

प्रेमसिंह किसनसिंह ठाकूर (३६) रा. तकीया धंतोली, शेख जिब्राईल ऊर्फ शेख पिंकी रज्जाक (३५) रा. तकीया आणि अनिस डंब ...

Three accused arrested for cannabis smuggling | गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक

गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक

प्रेमसिंह किसनसिंह ठाकूर (३६) रा. तकीया धंतोली, शेख जिब्राईल ऊर्फ शेख पिंकी रज्जाक (३५) रा. तकीया आणि अनिस डंब रा. ऑटोमोटिव्ह चौक, अशी आरोपींची नावे आहेत. धंतोलीतील तकीया परिसरात नेहमीच गांजाची विक्री होत असते. त्याकडे धंतोली पोलीस दुर्लक्ष करतात. तकीयातील सुमनबाईच्या घरासमोर प्रेमसिंह ठाकूर हा गांजा विकत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त विनीता साहू यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता तकीया परिसरात सापळा रचला. प्रेमसिंह आणि शेखला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ७०० रुपये किमतीचा ओलसर गांजा आणि वाहन जप्त करण्यात आले. तिन्ही आरोपी कुख्यात तस्कर असून पिंकी शेख हा काही दिवसापूर्वी तडीपार होता, तर प्रेमसिंह आणि अनिस यांच्यावर गांजा तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक राजेंद्र घुगे, हवालदार आदित्य यादव, राजेश सोनवणे, महिला कर्मचारी स्वाती बोरकर यांनी पार पाडली.

...........

Web Title: Three accused arrested for cannabis smuggling