शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांपूर्वी गृहमंत्र्यांना धमकी : दुबई आणि दिल्लीहून फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:05 IST

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला उडवून देण्याच्या धमकीच्या फोनपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबई आणि दिल्लीहून धमकीचे फोन आले.

ठळक मुद्देपोलिसांकडे तक्रार चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला उडवून देण्याच्या धमकीच्या फोनपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबई आणि दिल्लीहून धमकीचे फोन आले. वेगवेगळ्या नंबरवरून एकूण पाच वेळा फोन करून दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने अनिल देशमुख यांना ‘संभाल के रहना’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणाची तक्रार नागपूर पोलिसांकडे करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी देणारा फोन रविवारी रात्री दुबईहून आल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. मात्र तत्पूर्वीच शनिवारी रात्री १० वाजून २४ मिनिटांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबईहून चार वेळा फोन आले. हे चारही कॉल गृहमंत्री देशमुख यांचे स्वीय सहायक योगेश कोठेकर यांनी उचलले. आरोपी कॉलरने आपण दुबईतून बोलत असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख यांना सांभाळून राहा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी दुपारी १.३४ वाजता गृहमंत्री देशमुख यांच्याशी सिव्हिल लाईन्समधील बंगल्यावरच्या लँडलाईनवर फोन आला. कॉलरने आपले नाव संजयकुमार सिंग सांगितले आणि पुन्हा गृहमंत्री यांना धमकी दिली. देशमुख यांनी रविवारी रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना या धमकीच्या फोनची माहितीवजा तक्रार दिली. थेट गृहमंत्र्यांनाच फोन आल्यामुळे पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. नमूद दोन्ही क्रमांक कुठले आहेत, त्याचा शोध घेतला जात आहे.आता काही सांगणार नाही : पोलीस आयुक्त यासंबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी लोकमतने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले. आपण यावेळी या प्रकरणाच्या संबंधाने काहीही बोलू इच्छित नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर